संत गजानन महाराज मंदिरांचा मदतीचा हात ग्रामीण रुग्णालयात पाण्याची व सावलीची व्यवस्था

52

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या संकटात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी,असा संदेश देत माणुसकीचे नात्याने नेहमी कोणी मदतीसाठी पुढे येत नसतिंना संत गजानन महाराज मंदिराचे वतीने माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे मदतीकरीता सरसावले. त्यांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात सावलीची व्यवस्था करुन दिली तर बसण्यासाठी खुचीँ व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले आहे. ग्रामीण रुग्णालयात या व्यवस्थेची पाहणी उपविभाग अधिकारी श्रीकांत देशपांडे यांई करुन समाधान व्यक्त केले आहे.
अकोट ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरु आहे.तसेच कोरोना चाचणी देण्यासाठी लोक येत आहेत. या ठिकाणी वयोवृद्ध नागरिक ,महीला यांची गर्दी होत आहे. रुग्णालय परिसरात योग्य ती पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात लसीकरणसाठी आलेल्या नागरिकांना त्रासाचे व उन्हाचे चटके सहन करावे लागतात. या मुळे स्वतःचा जीव वाचवण्याकरीता लस साठी आलेल्या नागरिकाचा सावलीला अभावी कडक उन्हामुळेच बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशास्थितीत संत गजानन महाराज मंदिर संस्थान अंजनगाव रोड अकोटच्या वतीने माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी मोठ्या प्रमाणात मंडप टाकून सावली उपलब्ध करून दिली. बसण्यासाठी खुर्ची व थंडगार पाणी उपलब्ध करुन दिले. आरोग्य विभाग कोरोनायोध्दा लोकांचे जिव वाचवण्यासाठी झटत आहे. अशा बिकट परिस्थितीत महसुल नगरपरिषद व आरोग्य यंत्रणा सोबतच माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी दिलेला सावलीचा मदतीचा हात प्रेरणादायी ठरत आहे. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत योग्य त्या ठिकाणी व गोरगरिबांना योग्य त्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे.