आळंदीकरांनी रक्तदान महोत्सवातून आपल्या एकतेचे दर्शन घडविले : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश महारक्तदान शिबीरात ३८८ जनांनी केले रक्तदान

565

 

आळंदी : तिर्थक्षेत्र आळंदीला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संत परंपरेचा वारसा आहे. राज्यातील रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आळंदीत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलिस स्टेशन, आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामस्थ,पंचक्रोशीतील ग्रामस्थ, इतर सहयोगी संस्थानी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात आळंदीकरांनी मोठा सहभाग नोंदवून, आजचा हनुमान जन्मोत्सव रक्तदान महोत्सव म्हणून साजरा केला आहे.या रक्तदान शिबीरात तरुण युवक, पोलिस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, वारकरी संप्रदायाचे साधक, पत्रकार आणि महिलांनी सुध्दा रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात ३८८ रक्तदात्यांनी रक्तदान करून निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रसंगी पिंपरी चिंचवड बल्ड बँकेच्या पथकाने रक्त संकलित केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या महारक्तदान शिबीराचे उद्घाटन आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, महंत पुरुषोत्तम महाराज पाटील, राजाभाऊ चोपदार, नगरसेवक प्रशांत कुर्‍हाडे, सागर भोसले, आदित्य घुंडरे, सचिन गिलबिले, प्रकाश कुर्‍हाडे, माजी नगरसेवक डि.डि.भोसले, आनंद मुंगसे, दिनेश घुले, पोलिस अधिकारी मच्छिंद्र शेंडे, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, उत्तम गोगावले, किरण येळवंडे, युवराज वहीले, कोमल काळभोर, सतीष कुर्‍हाडे, निसार सय्यद, आकाश जोशी, बंडु काळे, सुनिल रानवडे, हभप पांडुरंग महाराज शितोळे, प्रसाद बोराटे, आनंद वडगावकर उपस्थित होते.
याशिबिराला पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त मंच्चक इप्पर, चाकण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की ‌‌आळंदीला ऐतिहासिक संत परंपरेचा आणि सांस्कृतिक वारसा आहे. तोच वारसा जपण्यासाठी जात, धर्म, पंथ सोडून एक मानवतेचा धर्माची शिकवण देण्यासाठी आज आळंदीकरांनी रक्तदान महोत्सवातून आपल्या एकतेचे दर्शन घडविले आहे. कोणताही धर्म एकमेंकामध्ये वैर निर्माण करण्याचं शिकवत नाही. माणुसकीच्या भावनेतून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.