गावातील गृह विलगीकरण आतील कोरोना बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यास सरपंच ग्रामसेवक तलाठ्यावर जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश

466

 

ऋषी सहारे
संपादक

गडचिरोली :- कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर गृह वीलगी करण्यात आलेल्या कोरोना बाधित याचा उपचाराअभावी गावातच मृत्यू झाल्यास सरपंच ग्रामसेवक तलाठी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी 26 एप्रिल रोजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांच्या नावे आदेश काढले आहेत. त्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
कोरूना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या कोरुना बाधितांना लक्षणानुसार कोरोना विलगीकरण कक्षात अथवा गृह विलगीकरण आत राहण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या 21 एप्रिल 2021 या पत्रानुसार यापुढे गृह विलगीकरण दिलेल्या रुग्णांचा दैनंदिन पाठपुरावा करण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे.
तालुक्‍यातील ज्या गावात इंटरनेट कव्हरेज नाही अशा गावात आशा स्वयंसेवकांनी गृह विलगीकरण असलेल्या रुग्णाला दैनंदिन भेट द्यावी व पल्स ऑक्सी मीटरने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे. शिक्षकाने आठवड्यातून दोन वेळा या गावाला भेटी देऊन आशा कडून रुग्णाची माहिती गोळा करावी व तालुकास्तरावर गुगल शिट भरावी.

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधून तालुक्यातील ज्या गावात इंटरनेट कव्हरेज नाही तेथील शिक्षकांची यादी तयार करावी व ती तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांना माहिती सादर करावी.
गृह विलगीकरण आत असलेल्या गंभीर रुग्णाची माहिती अाशा कडून प्राप्त झाल्यावर सदर गंभीर रुग्णाला तालुक्यातील कोविद केअर सेंटर डेडिकेटेड कोबिर हेल्थ सेंटरमध्ये भरती करण्याची जबाबदारी त्या गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी प्रशासकीय कार्यवाही पात्र राहील.
त्याचप्रमाणे सूचनांचे पालन न केल्यास व त्यामुळे सदर रुग्णाचा मृत्यू झाला संबंधित गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी प्रशासकीय कार्यवाहीस पात्र राहतील असेही मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या 26 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे कोरोना कर्तव्यात हायगय करणाऱ्या सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.