भिसी पोलिसांनी राबविली दारूबंदी मोहिम… — पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत कार्यवाहीत 13 हजार रु.ची अवैध दारू जप्त..

133

 

तालुका प्रतिनिधी

चिमूर तालुक्यातील भिसी पोलिसांनी मंगळवारी अतिसूक्ष्म दारूबंदी मोहिम राबवीली व भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये धाड मारून एकूण सात धाडी अंतर्गत 13 हजार रु. ची अवैध दारू जप्त केली.
मौजा नवतळा येथून ४ हजार १०० रु. किमतीचे ४१ नग गोवा विस्की देशी दारू,गडपिपरी येथून ५ हजार रु. किमतीचा मोहा सडवा २० लिटर,जामगाव येथून २ हजार रु किमतीची ५ लिटर मोहा दारू,भिसी येथून सहाशे रु. किमतीचे ६ नग देशी दारू,महालगाव येथून पाचशे रु. किमतीची ५ नग देशी दारू,भिसी येथून एक हजार रु. किमतीची १० नग देशी दारू जप्त करण्यात आली.
आरोपिंवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात येऊन इतर संशयित विक्रेत्यांना पो. स्टे. ला आणले व डिटेन करून समज देत आरोपींना सोडण्यात आले.