मुंडगाव ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थींचा सत्कार

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे
दि.३० जुलै रोजी ग्राम पंचायत मुंडगाव तर्फे प्रयाग संजय ढोरे सह गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गावातील सर्वांचा लाडका सर्व साधारण गुण मिळाल्यावर सुद्धा, विशेष विद्यार्थी म्हनुन ग्राम पंचायतने प्रयाग चा सत्कार केला . विशेष हे की प्रयाग हा कर्ण बधीर, असुन सामान्य शाळेत म्हनजे राधाबाई गणगणे विद्यालय मुंडगाव येथे इयत्ता दहावीत पास झाला. सत्कार समारंभाला आमदार अमोल मिटकरी, सरपंच श्रावण भरक्षे, उपसरपंच तुषार पाचकोर, पंकज. स.पं. सदस्य ज्ञानेश्वर दहिभात, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.