देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थाई वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करा माजी आमदार आनंदराव गेडाम यांची राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे मागणी

101

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी
आरमोरी – करोना महामारीने सर्वत्र जनता भयभीत आहे. रुग्ण व जनतेला आरोग्य विषयक मार्गदर्शन व उपचाराची खरी गरज आहे. परंतु तालुक्यातील देलनवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची जागा बरेच दिवसांपासून रीक्त असल्यामुळे सध्या एकच कट्राटी डाक्टराच्या भरोषावर आरोग्य सेवाचा डोलारा असल्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळत नसल्याने देलनवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थाई वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे निवेदनातून केली आहे.

आरमोरी तालुक्या पासुन देलनवाडी हे अंतर पचिविस किलोमीटर अंतरावर असल्यामुळे परीसरातील रुग्णांना रात्रभर काळी धावपळ करावी लागु नये म्हणून शासनाने देलनवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करुण मानापुर देलनवाडी मांगदा कुलकुली कोसरी यासह अनेक गावांतील रुग्णांना सेवा मिळतं होती परंतु गेल्या काही महिन्यांपासून येथिल वैद्यकीय अधिकारी यांची जागा रीक्त असुन अद्यापही या आरोग्य केंद्रांला वैद्यकीय अधिकारी मिळाले नाही.त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी त्यांचा तात्पुरता पदभार वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ वागधरे यांच्याकडे आहे परंतु त्यानाच आपल्या वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळण्यासच वेळ मिळत नाही त्यामुळे ते देलनवाडी केंद्राकडे त्याचे दुर्लक्ष असल्यामुळे दोन जागा स्थाई मंजुर असताना एक वैद्यकिय अधिकारी रीक्त असल्यामुळे सध्या कंत्राटी मानसेवी डाक्टराच्या भरोषावर आरोग्याच्या डोलारा सुरू असल्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास अपयश आले आहे. त्यामुळे पर्यायाने आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्रभर काळी धावपळ करावी लागते आतातर गावोगावी करोनाच्या भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणात आरोग्याची काळजी घेणारे वैद्यकीय अधिकारीच नसतील तर ते आरोग्य केंद्र काय कामाचे असे देलवाडी परीसरातील रुग्णानी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या कडे समस्या सांगितले यावरुन माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थाई वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावे अशी निवेदनातून मागणी केली आहे.