चिमूर तालुकातंर्गत अवैध मूरुम उत्खननाची अखेर वाटसप द्वारे चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांसह,पोलिस अधीक्षकांना तक्रार! — महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,गृहमंत्री ना.दिलीप वळसे-पाटील,विभागीय आयुक्त (महसूल) – नागपूर विभाग नागपूर,विभागीय पोलिस आयुक्त – नागपूर विभाग नागपूर,उपविभागीय अधिकारी चिमूर,पोलिस निरीक्षक-पोलिस स्टेशन चिमूर,पोलिस निरीक्षक-पोलिस स्टेशन भिसी,यांनाही वाटसप द्वारे तक्रारीची प्रत सादर… — चिमूर तहसीलदार संजय नागटिळक,मंडळ अधिकारी,तलाठी,यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याबरोबरच,त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची केली मागणी.. — शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक व जांभुळघाट येथील श्री.लक्ष्मण भानुदास घाडगे,यांच्यावर फौजदारी कारवाईसह शासनाच्या परिपत्रकानुसार दंडात्मक कारवाई करण्याची केली मागणी..

319

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

चिमूर तालुकातंर्गत सन २०१८ पासून तात्पुरता परवाना धारक यांच्याद्वारे व्यवसायाच्या नावावर वैध व अवैध गौण खनिज मूरुमाचे उत्खनंन प्रचंड प्रमाणात करण्यात आले आहे.अवैध मूरुम उत्खननाची माहिती चिमूर तहसिलदार संजय नागटिळक यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार कर्त्यांनी दिली.परंतू असंवेदनशील पणे काम करणाऱ्या चिमूर तहसीलदारांनी मूरुमाच्या अवैध उत्खनंनाकडे जाणिवपूर्वक कमालीचे दुर्लक्ष केले.तहसीलदार संजय नागटिळक यांचे अवैध मूरुम उत्खनंनाप्रती कर्तव्य हे शासनाचे परिपत्रकान्वये संवेदनशील असने आवश्यक होते.कदाचीत राजकीय आश्रयाच्या ओझ्याखाली व आशिर्वादाखाली वावरणाऱ्या चिमूर तहसीलदारांना जबाबदेही कर्तव्याचे विस्मरण झाले असावे व ते एका हुकुमशहा प्रमाणे वागू लागले.तहसीलदारांची हुकुमशहा पध्दतीची कार्यपद्धत शासनाचा करोडो रुपयांचा महसूल डूबविण्यास कारणीभूत ठरली असल्यामुळे मुरुमाच्या अवैध उत्खनंनाची अखेर तक्रारकर्त्यांनी वाॅटसप द्वारे चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे,जील्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे,यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे व सदर तक्रारीच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,गृहमंत्री ना‌.दिलीप वळसे-पाटील,यांना वाॅटसप द्वारे सादर करण्यात आल्या आहेत.

सन २०१८ पासून व्यवसायाच्या नावावर शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक व खाजगी व्यावसायीक लक्ष्मण भानुदास घाडगे व इतरजन,हे अवैध मूरुम उत्खननातंर्गत प्रचंड प्रमाणात मूरुमाचे उत्खनंन करुन,”शासनाचा,खरबो रुपयांचा महसूल डूबविण्यास कारणीभूत ठरलेले आहेत.अवैध मूरुम उत्खननाची तहसीलदार संजय नागटिळक यांना माहिती देवून सुध्दा ते जाणिवपूर्वक अवैध मूरुम उत्खननाकडे कायमचे दुर्लक्ष करीत होते व आहेत.यावरुन हे लक्षात येते की तहसीलदार संजय नागटिळक हे अवैध मूरुम उत्खनन करणाऱ्यां परवाणा धारकांचे पाठीराखे होते.याचबरोबर जिल्हा खनिकर्म विभागातील सबंधीत सुध्दा चिमूर तालुक्यातील अवैध गौण खनीज उत्खननाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत होते.

यावरून हे लक्षात येते की तहसीलदार चिमूर,जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी-कर्मचारी,अवैध मूरुम उत्खननधारक यांचे साटेलोटे असून,या तिघात बरेच खोल पाणी मुरले असल्याचे दिसते आहे.तिघांतील साटेलोटे व खोल मुरलेले पाणी अवैध आर्थिक व्यवहारांची शंका मजबूत करतात.

अवैध मूरुम उत्खननातंर्गत प्रचंड प्रमाणात आर्थिक माया बेकायदेशीरपणे कुणी जमवली?,हे चौकशीत निष्पन्न होणारच आहे.परंतू चिमूर तालुकातंर्गत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू-मूरुम-मातीच्या अवैध उत्खननाकडे तहसीलदार सारख्या सक्षम अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक कमालीचे दुर्लक्ष करणे हे न्यायोचित नाही.तहसीलदारच अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करीत असतील तर अवैध उत्खनंना बाबत सांगायचे कुणाला?हा प्रश्न भयंकर गंभीरता निर्माण करतो आहे.
चिमूर तालुक्यातंर्गत सातत्याने होणारे अवैध उत्खनन व चंद्रपूर जिल्ह्यातील सबंधीत अधिकाऱ्यांनी अवैध उत्खनंनाकडे फिरवलेली पाठ भयंकर छडयंत्राचा व सखोल मिलीभगतचा प्रकार तक्रारकर्त्यांना दिसून आल्यामुळे तक्रारकर्त्यांनी अखेर दिनांक २७ एप्रिल २०२१ ला,अवैध मूरुम उत्खननाची तक्रार चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर पोलिस अधीक्षक,महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात,गृहमंत्री ना.दिलीप वळसे-पाटील,विभागीय आयुक्त (महसूल) नागपूर विभाग नागपूर,विभागीय पोलिस आयुक्त-नागपूर विभाग नागपूर, उपविभागीय अधिकारी चिमूर,पोलिस निरीक्षक-पोलिस स्टेशन चिमूर,पोलिस निरीक्षक-पोलिस स्टेशन भिसी,यांच्याकडे वाॅटसप द्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे व सखोल चौकशी अंतर्गत सर्व दोषींवर भांदवी कलम ४२०(३४),३७९,१२०,३६८,३६९,३७१, अंतर्गत व इतर स्वरूपाची फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.याचबरोबर तहसीलदार संजय नागटिळक,मंडळ अधिकारी,तलाठी,यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी रेटून धरली आहे.तद्वतच दंडात्मक कारवाई सुध्दा लेखी तक्रारीत नमूद आहे.