कोरोना लसीकरणाकडे नागरीकांनी फिरवली पाठ – नागरिकांच्या मनात शंका,कुशंका वाढीस

136

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
कोरोनाची लस घेतल्याने अनेक नागरिकांच्या प्रकृत्या बिघडल्या जात असल्याने नागरिकांच्या मनात कोरोना लस घेण्यासंदर्भात शंका,कुशंका वाढीस लागून कोरोना लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.
शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या मनात कोरोनाची लस घेणे चांगले आहे की वाईट असा गैरसमज निर्माण झाला आहे.सुदृढ,दणकट असलेल्या नागरिकांच्या प्रकृती कोरोनाची लस घेतल्यानंतर तीन ते चार दिवस अंग दुःखी,डोकेदुखी,ताप येणे व इतर आजार होत असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.यामुळेच कोरोनाची लस घेण्याकडे नागरिकांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.काही नागरिकांच्या मते कोणतीही औषधे देण्याअगोदर आजार होणे महत्त्वाचे असते.मात्र कोरोनाची वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे.याठिकाणी आजार होण्याअगोदरच उपचार करून निदान केले जात आहे.नागरिकांच्या मनात शंका,कुशंका वाढीस लागल्याने काही नागरिक कोरोनाच्या भीतीमुळे ताप, सर्दी,खोकला,मळमळ व इतर आजार होऊनही मेडिकल येथून औषधे खरेदी करून घरीच इलाज करतांना दिसून येत आहेत.कोरोनाची चाचणी केल्यानंतर पॉजीटिव्ह अहवाल येणार की काय? या भीतीने काहीजण कोरोनाची चाचणीही करण्यास सामोरे येत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
कोरोनाची लस काही नागरिक घेतात तर बऱ्याच प्रमाणात नागरीक लस न घेण्यामागचे मुख्य कारण म्हणजे जनजागृतीचा अभाव होय.कोरोना लस घेतल्याने शरीरास योग्य की अयोग्य,प्रकृती बिघडण्यामागचे मुख्य कारण काय,लस घेतल्याने कोरोना होणार की नाही अशा अनेक शंका,कुशंकांचे निराकरण जनजागृतीच्या माध्यमातून केल्याशिवाय नागरिकांचा कोरोना लस घेण्यासंदर्भातील कल वाढणार नसल्याचे दिसून येते.
त्यामुळे कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांच्या मनातील शंका,कुशंका दूर करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे जनसामान्यांतुन बोलल्या जात आहे.