सिंदेवाही येथील कोवीड सेंटर, सोयी-सुविधांपासून कोसो दुर ! पालक मंत्री विजय वडेट्टीवार याकडे लक्ष देतील काय ?

150

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत टि. पोपटे,
उपसंपादक-९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत

देशात आणि महराराष्ट्रात कोरोना महामारीचे तांडव सुरू असतांनाच चंद्रपूर जिल्ह्यातील व सिंदेवाही तालुक्यातील कोवीड रुग्णांचे उपचारासाठी सुरू असलेल्या “मागासवर्गिय शासकीय वसतीग्रुह” येथील कोवीड सेंटर सोयी-सुविधांपासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. सदर कोवीड सेंटर विस्तीर्ण जागेत व खुल्या वातावरणात असून, वस्तीग्रुहाचे भव्य विस्तीर्ण इमारतीमध्ये ५० खाटांचे कोवीड सेंटर सुरू आहे. तिथे कोरोना बाधीत रुग्णांवर अविरत औषध उपचार सुरु आहे.*
*परंतू ५० खाटांचे सेंटरला ऑक्सिजन लेव्हल कमी असलेल्या रुग्णांसाठी फक्त दोनच ऑक्सिजन बेड रुग्णांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. त्यामूळे ऑक्सिजन लेवल कमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी जिल्हास्तरावर हलवीले जाते. आजतागायत सिंदेवाहीचे कोवीड सेंटरला अंदाजे २०० रुगण दाखल झाले. पैकी अंदाजे १५० रुगण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले. दाखल रुग्णांपैकी एक रुगण दगावला असून, सध्या ४८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहीचे अधिक्षक डॉ. झाडे यांनी सांगितले.*
*त्यांनी असेही सांगीतले की, टेकरी रोडला असलेल्या आदिवासी मुलांचे वसतीग्रुहाचे इमारतीमध्ये ५० बेडचे कोवीड सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू आहे. परंतू अजून काही ठरले नाही. तेव्हा सिंदेवाही तालुक्यातील जनतेची मागणी आहे की, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी क्षेत्रातील सौंदर्यीकरणावर करोडो रुपये मंजूर करण्यात आलेला निधी क्षेत्रातील सौंदर्यीकरणावर न खर्च करता, सिंदेवाही,ब्रम्हपूरी आणी सावली येथील कोवीड सेंटरवर खर्च करून क्षेत्रातील कोरोना बाधीत रुग्णांचे आरोग्याची काळजी घ्यावी. व सिंदेवाहीतील टेकरी रोडवरील प्रस्तावीत आदिवासी वसतीग्रुहात उभारण्यात येणाऱ्या नविन कोवीड सेंटरवर सर्वंकश सुविधायुक्त सेंटरची उभारणी करावी. जेनेकरून तालुक्यातील रुग्णांचा संपूर्ण उपचार तालुक्यातच होईल. यासाठी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे, शक्यतो व्हेंटीलेटरची सुद्धा सोय उपलब्ध करून द्यावी. तसेच रात्रीचे वेळेस कोवीड सेंटरला आरोग्य कर्मचारी कुणीच हजर राहत नाही. फक्त एक सफाई कर्मचारी हजर असतो, अशा अनेक रुग्णांचे नातेवाहीकांच्या तक्रारी आहेत, तेव्हा रात्रीला रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून एखाद्या सिस्टरची वा ब्रदरची नियुक्ती करावी. जेनेकरूण रुग्णांना त्वरीत आवश्यक उपचार मिळेल. करिता संमंधीत बाबींची त्वरीत दखल घेऊन, पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाला व जिल्हा प्रशासनाला तसे आदेश द्यावेत. तसेच सुरू होणारे दुसरे कोवीड सेंटर सुविधायुक्त असेल याची दक्षता घ्यावी. तसेच तालुक्यातील जनतेच्या आरोग्याबाबतची काळजी घेत सजग राहून सहकार्य करावे अशी सिंदेवाही तालुक्यातील जनतेची आग्रही मागणी आहे.