कोरोना रुग्णाच्या मदतीला धावून आले सतीश मोरे कामथे रुग्णालयात देत आहेत दररोज दहा ऑक्सिजन सिलेंडर. अंत्यसंस्कार करीता करणार मोफत लाकूडपुरवठा.

78

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : चिपळूण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे,अशा परिस्थितीत कामथे उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन ची कमतरता भासू नये म्हणून भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष सतीश मोरे मदतीला धावून आले आहेत, स्वखर्चाने कामथे रुग्णालयात दररोज दहा ऑक्सिजन सिलेंडर मोरे देत अत्यंत महत्वाची भूमिका ते बजावत आहेत. एवढेच न्हवे तर कोरोना काळात निधन झालेल्या तालुक्यातील सर्व रुग्णाला आवश्यकता भासल्यास मागणी वरून मोफत लाकूड पुरवठा आपण करणार असल्याचे सतीश मोरे यांनी पत्ररांशी बोलतांना सांगितले.
मदतकार्य असो वा तालुक्यात आलेली नेसर्गिक आपत्ती नेहमी पुढाकार घेऊन सेवाकार्य करणारे सतीश मोरे यांनी मागील वर्षी कोरोना काळात स्वखर्चाने आणि भाजप पक्षाच्या वतीने त्यांनी मोठे मदतकार्य केले होते,धान्य किट,सॅनिटायझर,मास्क या सह रुग्णांना प्रत्यक्ष मदत करणे या कामात मोरे यांचा पुढाकार होता .
चिपळूण शहरातील रामतीर्थ स्मशान भूमीत मोरे यांनी सुमारे दहा टन लाकूड जळावाकरिता मोफत दिले,तालुक्यात असलेली ऑक्सिजन ची कमतरता लक्षात घेऊन रुग्णाच्या मदतीला मोरे तात्काळ धावून आले आहेत,मागील चार दिवस दररोज दहा प्रमाणे स्वखर्चाने ऑक्सिजन सिलेंडर कामथे रुगणालयात देण्याचा एक कलमी कार्यक्रम मोरे यांच्या वतीने सुरू आहे,सोमवारी सतीश मोरे यांनी दहा ऑक्सिजन सिलेंडर कामथे रुग्णालयाच्या स्वाधीन केले या वेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय सानप, डॉ.हुंकारे, मदतीस आंबरे आदी उपस्थित होते.कोरोना संक्रमण कमी होई पर्यंत आपले पुढेही असेच मदतकार्य सुरू राहणार असून पुढेही दररोज दहा सिलेंडर देणार असल्याचे सतीश मोरे यांनी सांगितले.

*दखल न्यूज भारत.*