संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी शिवसेनेचे विलास ठाकरे यांची निवड

99

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नुकतेच देसाईगंज तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी शिवसेनेचे देसाईगंज विभागप्रमुख विलास ठाकरे यांची निवड केली.
संगायो शाखेतील योजनेचा लाभ समाजातील तळागळातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवीण्याच्या दृष्टीकोनातून योग्य व्यक्तींची निवड व्हावी व संगायो शाखेतील लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे,चालू प्रकरणे व नवीन प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी समितीतील अध्यक्ष,सदस्य यांच्या नियुक्त्या करण्यात आले असल्याचे ना.शिंदे यांनी व्यक्त केले. त्यानुसार ठाकरे यांची नियुक्ती देण्यात आली असल्याने संगायो शाखेतील कार्य तत्परतेने करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे यांनी आपल्या निवडीचे श्रेय गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे,जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पोतदार,सहसंपर्कप्रमुख माजी आमदार रामकृष्ण मडावी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार,उपजिल्हाप्रमुख भरत जोशी,विधानसभा समन्वयक गोपाल चौधरी,माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल,शिवसेनेचे देसाईगंज तालुका प्रमुख डॉ.श्रीकांत बन्सोड,विजय सहारे प्रभारी तालुकाप्रमुख यांना दिले आहे.
निवड झाल्याबद्दल अशोक माडावार,विठ्ठल ढोरे,होमराज गायकवाड,सुरेंद्र दोनाडकर,मोहन शेंडे,ज्ञानेश्वर कवासे,पंकज पाटील,योगेश नेवारे,ईश्वर गायकवाड, संजय बुल्ले,महेंद्र मेश्राम,दिलीप दिघोरे,देवेंद्र पिलारे,श्रावण राऊत,कैलाश मस्के,गोपाल आठवले व शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी विलास ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.