मोर्च्यांना परवानगी देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा!’

54

हर्ष साखरे दखल न्युज भारत
भारत:- देशात कोव्हिड-१९ साथरोगाचा प्रचंड वेगाने प्रसार होत असतानाही निवडणूक प्रचारसभांना परवानगी दिल्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने आज (सोमवार) भारतीय निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले आहे. सद्या संपूर्ण देश ज्या मोठ्या संकटात सापडला आहे, त्या कोव्हिड-१९च्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोगाला ‘एकमेवरित्या जबाबदार’ धरले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने देशात कोरोना विषाणू आजाराच्या वेगाने पसरणाऱ्या दुसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे. मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी आयोगाला फटकरताना म्हटले की, कोव्हिड-१९ काळात राजकीय मोर्च्यांना परवानगी देणाऱ्या निवडणूक अधिकऱ्यांवर ‘खुनाचा गुन्हा’ दाखल करण्यात यायला हवा. मद्रास उच्च न्यायालयात निवडणूक व कोव्हिड-१९ उपाययोजना यांसंबंधी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने असे म्हटले.