महामार्गावर वादळी पावसाने पडलेली झाडे देत आहेत अपघाताला आमंत्रण. अहेरी ते एटापल्ली महामार्गावरील स्थिती.

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिरोली जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून येथील रस्ते व महामार्ग हे अनेक डोंगर दऱ्या व घनदाट जंगलातून गेलेली आहेत. जिल्ह्यातील अहेरी एटापल्ली महामार्गावरील येलचिल गावपरिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला असता येलचिल गावा वरून 3 कि. मी. अंतरावर महामार्गात दोन ठिकाणी झाडे पडून असल्याने वाहनधारकांना रस्त्या खालून आपले वाहन न्यावे लागत आहे. झाडांच्या हिरव्यागार फाद्यांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघातास आमंत्रण देत आहे. ही झाडे उचल करण्यात शासनाचे दुर्लक्ष होत असून ही स्तिथी त्या धोका दायक वळणावरती असून ये जा करण्याऱ्या वाहनांना धोका पत्करून समोर जावे लागत आहे.
करिता सदर महामार्गावरिल स्तिथीतीची गंभिरता लक्षात घेऊन त्वरीत उपाययोजना करावी असे मत वाहनधारकांसह जनसामान्य व्यक्ती द्वारा व्यक्त करण्यात येत आहे.