सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यां आरमोरी येथील १८ जणांवर केली दंडात्मक कारवाई ; १८०० रूपयांचा दंड केला वसूल पिचकाऱ्या मारणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी :-
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना वाढण्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मुक्तीपथ तालुका कार्यालय, नगर परिषद, पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दोन दिवस शहरात गस्त घालून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १,८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी विना मास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. थुंकीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होतो. यावर उपाययोजना करण्यासाठी मुक्तीपथ अभियानाच्या पुढाकारातून स्थानिक प्रशासनाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एकूण १८ नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १, ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारणाऱ्यांचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत.