गावाच्या स्वरक्षणासाठी काटेरी कुंपण!

970

 

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक

देशात कोरोनाच्या दुसऱ्या टप्याने हाहाकार माजला असून, महाराष्ट्र होरपळून निघत आहे, महाराष्ट्रात covid-19 रुग्णांची संख्या लाखाच्या घरात गेली असून आरोग्य व्यवस्थेची दानादान होताना दिसत आहे.
महाराष्ट्रामध्ये एक एप्रिल पासून लॉक डाऊन असून सध्यास्थितीत महाराष्ट्रामध्ये कडक लॉक डाऊन आहे.

गतवर्षी शहरी भागामध्ये थैमान घातलेल्या कोरोना या आजाराने ग्रामीण भागात प्रवेश केला असून ग्रामीण भागामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कोरोना चे रुग्ण आढळत आहेत. काही गावांमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या अचंबित करणारी आहे.

असे असताना सुद्धा काही गावांमध्ये अजून पर्यंत कोरोना ने सिरकाव केलेला नाही किंवा ज्या गावांमध्ये रुग्ण आढळले नाही त्या गावात गावकऱ्यांनी स्वतःचं गावाच्या रक्षणासाठी जबाबदारी घेतलेली आहे.याच अनुषंगाने चिमूर तालुक्यातील बोडदा या गावांमध्ये गावाच्या प्रवेशद्वारावरच झाडाचे काटेरी कुंपण तयार करण्यात आले असून,या गावांमध्ये इतरेत्र कोणत्याही बाहेर गावच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कामे वगळता इतर गावचे व्यक्ती या गावांमध्ये दिसल्यास ग्रामपंचायत द्वारे पाचशे रुपये दंड आकारण्यात सुद्धा येत आहे. या गावाने घेतलेला हा निर्णय केलेली कृती इतर गावासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरते काय हे पाहणे महत्त्वाचे ठरते.