नक्षलवादयांनी केली वाहनांची जाळपोळ

450

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:-आलापल्ली ते भामरागड या मुख्य मार्गालगत असलेल्या मेडपल्ली गावाजवळ नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराच्या वाहनांची जाळपोळ केली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आलापल्लीपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेडपल्ली गावाजवळ प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ताच्या कामावरील ट्रॅक्टर, जेसीबी, पाण्याचा टँकर अशी वाहने ठेवलेली होती. मध्यरात्री 15 ते 20 नक्षलवाद्यांनी येऊन ती वाहने जाळली. हे काम छत्तीसगडमधील एका कंत्राटदाराकडून केले जात होते.