12 रेमडेसीवीर इंजेक्शन गेले चोरीस ; उडाली खळबळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील घटना

237

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालय , गडचिरोली येथून 12 रेमीडेसिवीर इंजेक्शन चोरीची घटना उघडकीस आल्याने येथे खळबळ माजली आहे . थेट येथील पल्लवी मेश्राम ( 35 ) या आरोग्य परिचारिकेने दोन आठवड्यापूर्वी हे इंजेक्शन चोरुन नागपूरच्या काळाबाजार विकले आहेत . सदर परिचारिकेला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे . आज तिला पीसीआर करिता न्यायालयात हजर करणार आहेत . राज्यात रेमीडेसिवीर इंजेक्शन चा काळाबाजार सुरू आहे . याचा सापळा आता गडचिरोली सारख्या भागात सुद्धा कार्यरत आहे . यात जिल्हा सामान्य रुग्णालय , गडचिरोलीला सुद्धा सुरूंग लागला आहे.यात चक्क एक परिचारिका सहभागी आहे . हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे .

नागपूर येथे बेलतरोडी पोलिसांनी रेमीडेसिवीर इंजेक्शन चोरांचा टोळीचा पर्दापाश केला आहे.या टोळीचा कसून तपास करताना त्यांना पोलिसांनी बाजीराव दाखवताच एक आरोपी अतुल भीमराव वाळके ( 36 टा.आर्युवेदिक ले आउट , नागपूर ) याने हि धक्कादायक माहिती दिली . जिल्हा सामान्य रुग्णालय , गडचिरोली येथे कार्यरत आरोग्य परिचारिका पल्लवी मेश्राम या वाळके यांच्या मेव्हणी आहेत . त्या गडचिरोली येथे मागील आठ वर्षापासून येथे कार्यरत आहेत . नागपूर पोलिसांनी तिला काल ताब्यात घेतले असून तिला आज न्यायालयात हजर करणार आहे .आता पुढील पोलिस तपासात पल्लवी कुणाचे नाव घेणार? पल्लवी सोबत पुन्हा कोण सहभागी आहे? या सर्व घटनेकडे जिल्हा वाशीयांचे लक्ष लागलेले आहे.