Home कोरोना  ..सकाळी ११ तर सायंकाळी पुन्हा दोन जण कोरोना पाँजिटीव महादुला कोराडी त;...

..सकाळी ११ तर सायंकाळी पुन्हा दोन जण कोरोना पाँजिटीव महादुला कोराडी त; माजी पालकमंत्री बावनकुळे कडक लाँक डाऊन ची मागणी केव्हा करणार?

1902

 

महादुला-कोराडी /नागपुर :३० जुलै २०२०
आज दि. ३० जुलै पर्यंत सकाळी ११ तर सायंकाळी पुन्हा २ नवीन कोरोना पाँजिटीव पेशंट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे की आता महादुला कोराडीत घरोघरी कोरोना पेशंट आढळतील की काय? अशी चिंता व भीती व्यक्त केली जात आहे.
महादुला कोराडी येथील कांन्क्टैक्टर असोशियन चे वरिष्ठ नेते कोरोना पाँजिटीव आढळले त्यानंतर तर आता त्यांच्या संपर्कातील इतर ठेकेदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कित्येक जण समोर येऊन आपली टेस्ट करीत नाहीत ही चिंतेची बाब आहे. आज दुपारी जेव्हां कांन्क्टैक्टर असोशियन च्या नेत्यांचा रिपोर्ट पाँजिटीव आला त्यावेळी ते मजदुर चौकात त्यांच्या सहकारी ठेकेदार मित्रांसोबत बसुन होते. मात्र त्यांच्या सोबत बसलेल्या ठेकेदारांनी अजुनही आपली टेस्ट का केली नाही? अशी मजदुर चौकात चर्चा सुरु आहे.
आज सायंकाळी जवाहर नगर येथील ३० वर्षिय महिलेची रिपोर्ट पाँजिटीव आली आहे. या महिलेचा मोठा दीर सकाळी च पाँजिटीव निघाला होता. ही महिला नांदेड हुन महादुला झेंडा चौकातील एका स्कार्पियो वाहनाने महादुला येथे आठ दिवसांपुर्वी परत आली होती.
दुसरा पेशंट महाजेनको कोराडी CPRI कोराडी काँलनी मधील २५ वर्षिय युवक आढळला आहे. या युवकाची आई कुणाल हाँस्पिटल ला अँडमिट होती आणि ती तिथे कोरोना पाँजिटीव निघाली. तिला डबा देण्यासाठी हा युवक आईकडे च होता अशी सुत्रांनी माहिती दिली आहे. महाजेनको प्रशासनाने तसेच गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी या युवकाला वारेगाव येथे कोरोंटाईन केले असल्याची माहिती आहे.
नागपुरात जागेअभावी आज सकाळी मिळालेल्या काही कोरोना पाँजिटीव पेशंट्स ना रात्री उशिरापर्यंत वारेगाव येथे कोरोंटाईन करणार असुन काहींना उद्या सकाळी वारेगाव लाच शिफ्ट करणार आहेत. तर कांन्क्टैक्टर असोशियन चे पाँजिटीव नेते यांना एम्स हाँस्पिटल ला उपचारासाठी दाखल करण्यात येईल अशी माहिती डॉ. राऊत यांनी दिली आहे.
महादुला नगरपंचायत आणि कोराडी ग्रा पं. मध्ये कोरोना पाँजिटीव पेशंट ची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण करण्यासाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतितात्काळ लाँक डाऊन करण्याची मागणी करावी अशी जनतेला अपेक्षा आहे. कारण येथील नागरिकांनी लाँक डाऊन चे पालन केले नाही. लाँक डाऊन मध्ये पार्टी आयोजन किंवा गर्दी जमवणारे धरणे आंदोलन होतेच कसे? याला कोराडी पोलिसांनी परवानगी दिलीच नाही तर मग लाँक डाऊन तोडले म्हणून एरव्ही कोराडी पो. स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजिर शेख कडक कायदेशीर कारवाई करतांना दिसत नाही. आपल्या जवळच्या राजकीय नेत्यांना त्यांनी खुली सुट दिली की काय? अशी चर्चा आहे. कोराडी पोलिस स्टेशन ला नव्याने बदलुन येताच नवे नवे प्रयोग करुन लाँक डाऊन तोडणाऱ्यांना अनोखी शिक्षा देणारे वजिर शेख आता महादुला-कोराडी येथे आता फारसे अँक्टिव दिसत नाही. डीबी स्क्वाड च्या गाड्या किंवा यांचे पोलिस झोपडपट्ट्यामध्ये बंदोबस्तात दिसत नाही. निव्वळ सट्टा व्यावसायिक अवैध दारु विक्रेत्यांच्या घरी सायंकाळी चक्कर कशासाठी मारतात? निव्वळ हफ्त्यांसाठीच काय? यावेळी पोलिस यंत्रणा पुर्णतः कोलमडुन पडली आहे.
गरजेच्या वेळी च जर कोराडी पोलिस मदतीला येत नसतील तर कोराडी पोलिस काय कामाचे? असा सवाल जनता करीत आहे. कारण जयभीम नगर च्या बाजुला एक नर्सरी आहे तिथे ३-४ दिवसापासून एक म्हातारा पडुन होता. काल परवा या म्हाताऱ्या ची चौकशी करुन त्याला उपचारासाठी कोराडी पोलिसांनी नेण्यासाठी काही समाजसेवकांनी फोन केले पण कोराडी पोलिस काल आले त्याला दुरुन पाहिले आणि निघुन गेलेत. त्यामुळे कोराडी पोलिसांतील माणुसकी संपली काय? उपचाराअभावी आज सकाळी त्या म्हाताऱ्या चा म्रृत्यु झाला. त्याच्या म्रृत्यु ला कोराडी पोलिस जबाबदार आहेत असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे महादुला नगरपंचायत, कोराडी ग्रा पं तसेच कोराडी पोलिसांसोबत अतितात्काळ माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिटिंग घेऊन एक महिना कडक लाँक डाऊन करावे अशी अपेक्षा आहे.

Previous articleविश्व वारकरी सेनेचे अकोट तहसिल येथे भजन आंदोलन
Next articleसार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यां आरमोरी येथील १८ जणांवर केली दंडात्मक कारवाई ; १८०० रूपयांचा दंड केला वसूल पिचकाऱ्या मारणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले