प्रख्यात चित्रकार प्रभाकर पानघाटे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन

151

 

विशाल ठोबंरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

हसतमुख चेहयऱ्याचे प्रख्यात चित्रकार प्रभाकर कृष्णाजी पानघाटे यांचे रविवारी दि.२५ एप्रिल २०२१ रोजी, पाहटेच्या दरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले वणी परीसरात एक उत्तम आणि उत्कृष्ट चित्रकार म्हणून ते अनेकांना सुपरिचित होते.थोरल्यापासुन तर धाकट्यापर्यत आणि नेत्यांपासून तर सामांन्यापर्यत अश्या कित्येकांची हुबेहूब चित्रे त्यांनी रेखाटले आहे. आजही शहर आणि खेड्या पाड्यातल्या असंख्य घरात त्यांनी काढलेली चित्रे भिंतीवर ताट मानाने झळकत आहे. त्यांच्या चित्रकारीच्या कलेची अनेकांना भुरळ घातली होती.आम्हांसकट अनेकांना अशा आठवणी देऊन ते आज अनंतात विलीन झाले आहे.या सरांना दखल न्यूज पोर्टल परीवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.