काग (सोनेगाव) रेती घाट अंतर्गत वाळू उपसा स्थळांचे मोजमाप करणे आवश्यक! — ठरावा पेक्षा रेतीचा जास्त उपसा करण्यात आल्याचा संसय.. — राजेश शंकर मेश्राम चे पाॅन कार्ड व बँक रिटर्न तपासणे गरजेचे!

249

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

चिमूर तालुकातंर्गत मौजा काग (सोनेगाव) येथील रेती घाट लिलाव प्रक्रिया संसयाच्या भोवऱ्यात वादग्रस्त ठरली असली तरी,या रेतीघाटावरुन मागील १ महिन्यात रेतीचा प्रचंड प्रमाणात उपसा करण्यात आलेला आहे.यामुळे काग (सोनेगाव) येथील उपसा केलेल्या प्रत्येक रेती स्थळांचे मोजमाप होणे आवश्यक आहे व उपसा केलेल्या रेतीचे सत्य बाहेर पडणे तितकेच महत्त्वाचे आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी ४ मार्च २०२१ ला चिमूर तालुक्यातील मौजा काग सोनेगाव अंतर्गत भुमापण क्रमांक ८०,८१,८२,८३,ला अनुसरून २०१९ च्या कागदपत्रान्वये रेती घाट लिलाव केला व रेती घाट लिलावाला अनुसरून २ वर्षात २२०८ रेती ब्राशचे उत्खनंन करण्याची परवानगी रेती घाट लिलाव धारक राजेश शंकर मेश्राम यांना दिल्या गेली.राजेश मेश्राम यांना तब्बल २ वर्षात २२०८ रेती ब्राशचे उत्खनंन करण्याची परवानगी दिली असताना,सदर लिलाव रेती घाटावरुन केवळ १ महिन्यात प्रचंड प्रमाणात रेतीचा उपसा लिलावधारकांकडून करण्यात आला आहे.
काग (सोनेगाव) अंतर्गत रेती घाटावरुन प्रचंड प्रमाणात उपसा होणाऱ्या रेती स्थळांकडे तहसीलदार संजय नागटिळक यांचे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून येते.मात्र २०१९ च्या कागदपत्रान्वये लिलाव करण्यात आलेला रेती घाट कायदेशीर आहे एवढेच शिध्द करण्यासाठी त्यांची धडपड दिसते आहे.२ वर्षांपुर्वीच्या कागदपत्रांन्वये चंद्रपूर जिल्हाधिकारी व चिमूर तहसिलदार रेती घाट लिलाव प्रक्रिया पार पाडत असतील तर प्रत्येक महत्त्वाची कामे सुध्दा जुन्या कागदपत्रांना अनुसरून करण्यास काय हरकत आहे?हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आता काग (सोनेगाव) रेती घाट लिलाव प्रक्रियेला अनुसरून पडला आहे.
तद्वतच रेती घाट लिलाव धारक राजेश शंकर मेश्राम यांचे वार्षिक बॅंक व्यवहार आजपर्यंत किती रुपयांचे झाले आहेत व त्यांनी बॅंक रिटर्न किती रुपयांचे भरले आहेत याची सुध्दा चौकशी त्यांच्या पॅनकार्डला अनुसरून झाली पाहिजे.राजेश मेश्राम यांनी अल्पावधीतच लाखो रुपयांचे व्यवहार केले असल्यामुळे त्यांची चल-अचल मालमत्ता समोर येणे कायदेशीर दृष्ट्या गरजेचे आहे.
काग (सोनेगाव) अंतर्गत रेती घाटावरुन प्रचंड प्रमाणात रेतीचा झालेला उपसा हा गंभीर मुद्दा आहे.या गंभीर मुद्द्याकडे चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व चिमूर तहसिलदार संजय नागटिळक यांनी तातडीने लक्ष देत रेतीचे उत्खनंन केलेल्या सर्व स्थळांचे मोजमाप त्यांनी तात्काळ करणे आवश्यक आहे.रेती घाट उत्खनंन स्थानाचे मोजमाप झाल्यास हा रेती घाट बंद करण्याची वेळ प्रशासनावर येण्याची दाट शक्यता आहे.
तात्पुरता परवाना मूरुम धारक,रेती घाट लिलाव धारक यांच्या सोबत अधिकाऱ्यांचे असलेले साटेलोटेच मूरुम-रेतीच्या अवैध उत्खनंनातंर्गत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे वास्तव्य उघड्या डोळ्यांनी जनता दररोज बघते आहे.