पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली कडून प्रवासासाठी ई पास बंधनकारक

667

 

ऋषी सहारे
संपादक

गडचिरोली-
महाराष्ट्रात कोणाचे संसर्गाची दुसरी लाट थैमान घालत आहे त्याला रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत निर्बंध घालण्यात आलेले आहेत महाराष्ट्र शासनाने दिनांक 21 एप्रिल 2021 रोजी काढलेल्या आदेशानुसारच आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करायचा असेल तर त्यासाठी पोलिस दलाकडून ई पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे

महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या आदेशानुसार पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली यांचेकडून सुचित करण्यात येते की अत्यावश्यक सेवा म्हणजे वैद्यकीय कारण आजारी नातेवाईकांना भेटणे अंत्यविधी इत्यादीसाठी आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य प्रवासासाठी ई पास घेणे बंधनकारक आहे त्यानुसार नागरिकांना पुढील दोन प्रकारे प्रवासासाठी पास मिळेल
1) स्थानिक पोलिस स्टेशनला अत्यावश्यक कागदपत्रांसह
2) ई पास काढण्याकरिता सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून covid-19 चे कोणतेही लक्षण नसलेले वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागेल
ई पास साठी अर्ज करणे करीता सर्वप्रथम
Https://covid-19.mhpolice.in या संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी विचारलेले अत्यावश्यक कारण कागदपत्र नमूद करावे त्यानंतर फोटो अपलोड करुन अर्ज दाखल करावे अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी मिळेल तो आयडी सेव करून त्या आयडी वरून तुमच्या ई पास ची मंजुरी पोलीस विभागाकडून पडताळणी होऊन तुम्हाला पास डाऊनलोड करता येईल
अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून दिलेला पास सोबत असणे बंधनकारक राहील तसेच आंतरजिल्हा आंतरराज्य तसेच जिल्हा अंतर्गत प्रवास करते वेळी चालकासह वाहन क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी प्रवास करु शकतील याची नोंद घ्यावी.