विश्व वारकरी सेनेचे अकोट तहसिल येथे भजन आंदोलन

109

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे

पंढरपूर येथे महाराज मंडळीवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात आज पंढरपूर येथे ह.भ.प.गणेश महाराज शेटे,अरूण महाराज बुरघाटे व महाराज मंडळी यांनी उपोषण सुरु केले आहे.त्या उपोषणाच्या निमित्त आज अकोट तहसिल येथे ह.भ.प.विठ्ठल महाराज साबळे व सर्व महाराज मंडळी यांच्या उपस्थितीत तहसिलवर आज भजन अंदोलन करण्यात आले आहे.दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.यावेळी अंदोलनाची दखल घेत अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे,तहसीलदार अशोक गिते,उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल सोनवणे शहर ठाणेदार संतोष महल्ले,ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यावेळी उपस्थित होते.