गावातील युवकाने 70 वर्षांच्या आजीवर केला……?

425

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

दिल्ली :- पंजाबमध्ये एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. लुधियानाच्या सिधवांबेट पोलीस ठाण्याअंतर्गत गावात एका युवकाने 70 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. तब्येत बिघडल्यावर वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केले आणि तेव्हा वृद्ध महिलेने आपल्या नातीला याबद्दल सांगितले. पीडित महिलेच्या नातीच्या तक्रारीवरून पोलिस ठाणे सिंधवाबेट पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 35 वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. 21 एप्रिलच्या रात्री ती घरी एकटी होती. दरम्यान, एका युवकाने घरात घुसून त्या वृद्ध महिलेवर बलात्कार केला. पीडितेने आरडाओरडा करताच तो घटनास्थळावरून पळून गेला. तिने कुणालाही याबद्दल सांगितले नव्हते परंतु जेव्हा तिची तब्येत ढासळली तेव्हा तिने आपल्या नातीला सर्व सांगितले. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरून, आरोपीविरूद्ध सिंधवाबेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
अश्लील व्हिडिओ बनवून केली खंडणीची मागणी
अपहरणानंतर अश्लील व्हिडिओ बनवून 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात बरनाला पोलिसांनी यश मिळविले आहे. ठाणे सदर प्रभारी जसविंदर सिंग यांनी सांगितले की, जगदेवसिंग येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीने तक्रार दिली की, त्याचा भाऊ गुरथीजसिंग यांना प्रदीप सिंग, गुरप्रीतसिंग, विककर सिंग, सुखपाल सिंग यांनी संदीप कौर नावाच्या मुलीकडून फोन करून बरनाला बसस्थानक येथे बोलावून घेतले. फोनवर मुलगी म्हणाली की तिला त्यांचा भाऊ आवडतो. मुलीच्या बोलण्यात फासून तक्रारदाराचा भाऊ गुरतेजसिंग त्याच्या एका साथीदार गुरसेवक सिंहसमवेत बरनालाच्या स्टँडवर गेला. तेथे पोहोचल्यावर संदीप कौरचे साथीदार प्रदीप सिंह, गुरप्रीत सिंग, विकर सिंग आणि सुखपाल सिंग यांनी गुरतेज आणि गुरसेवक यांचे अपहरण केले. गाडीत बसून दर्शन सिंह यांनी संघेडाच्या शेतात मोटरला नेऊन तिथे दोघांना मारहाण केली. गुरतेजसिंगचा अश्लील व्हिडिओ बनवल्यानंतर त्याने कुटुंबाला 25 लाख रुपये देण्यास सांगितले. यावर त्याने आपल्या नातेवाईकांना बोलावले. त्यांचे नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा या दोघांनाही आरोपींनी पळवून नेले. पोलिसांनी सर्व आरोपींना पकडले. जगदेव सिंह यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.