अनोळखी वृद्ध ईसमाचा मृत्युदेह आढळला

61

 

विशाल ठोबंरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

वणी – मारेगाव मार्गावरील लालपुलीया परीसरातील तिरुपती काट्या चे बाजुला तसेच गोयल कोळसा प्लॉट जवळ एक वयोवृद्ध ईसम मृत अवस्थेत मिळून आला आहे.त्या व्यक्तीचे वय अंदाजे 70 ते 75 असुन उजवे हातावर एकनाथ असे नांव गोंदलेले आहे, तरी सदर इसमास कोणी ओळखत असेल तर पोलीस स्टेशन वणी येथे कळवावे असे आवाहन वणी पोलिस स्टेशन च्या वतीने कळविण्यात आले आहे.