भाऊ…..वैरागड येथील दोघेजण सापडले दारू काढताना….

339

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

आरमोरी:- तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वैरागड – चामोर्शी रोडवरील एका पुलाच्या नाल्यालगत असणाऱ्या झुडपी जंगलात अवैध रित्या मोहाफुलाच्या दारूची हातभट्टी चालू आहे.अशी गोपनीय माहीती पोलीस स्टेशन आरमोरी यांना मिळाली असता आरमोरी पोलीस स्टेशन चे पो. नाईक.नरेश वासेकर, पो.कॉ.सुमित बरडे, पो.कॉ.शैलेश पवार यांनी घटनास्थळावर जाऊन वैरागड येथील रहिवासी ,(१) लोमेश सहारे वय ४०, व(२) सदाशिव नेवारे वय ३८ अशा दोघांवर पोलीस स्टेशन आरमोरी तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली व पो.निरीक्षक आरमोरी यांच्या मार्गद्शनाखाली करण्यात आली.