वेकोलि खुली खदान च्या नं ४ डम्पींग यार्ड जवळ कोळसा, लोंखडाचे तुकडे वेचण्याकरिता गेले असता,युवकास डोक्यावर मारून जख्मी केले.

44

 

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

कन्हान (ता प्र): – वेकोलि खुली खदान च्या नं ४ डम्पींग यार्ड जवळ कोळसा, लोंखडाचे तुकडे वेचण्याकरिता गेले असतालि कामठी खुली खदान डम्पींग यार्ड च्या मातीतुन कोळसा व लोंखडाचे तुकडे वेचण्यास गेलेल्या भारत कारके यांचे वर आरोपीचे लोंखडाचे तुकडे घेतल्याचा शक लावुन वाद करून सायंकाळी फिर्यादीस आरोपीतानी संगनमत करून फिर्यादी च्या डोक्यावर लोंखडी सळाख सारख्या चापट वस्तुने मारून जख्मी करून शिवीगाळ करित जिवे मारण्या ची धमकी दिल्याने कन्हान पो स्टे ला गुन्हा दाखल करून आरोपींताचा शोध सुरू आहे.
शुक्रवार (दि.२३) ला सकाळी भारत शामलाल कारके वय २५ वर्ष रा. खदान नं ४ हा आपल्या भाऊ जी सोबत वेकोलि खुली खदान च्या नं ४ डम्पींग यार्ड जवळ कोळसा, लोंखडाचे तुकडे वेचण्याकरिता गेले असता तेथे आरोपी १) गणेश प्रजापती व २) सोनु प्रजापती दोन्ही रा. खदान नं ४ हे सुध्दा कोळसाचे, लों खडाचे तुकडे मातीच्या डम्पींग यार्ड मधुन वेचत होते. तेव्हा आरोपीने जमा केलेले लोंखडी तुकडे दिसत नस ल्याने ते फिर्यादीला शक लावुन बोलत होते की, तुम्ही च माझे लोंखडी तुकडे घेतले या कारणावरून फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला. यानंतर फिर्यादी व आ रोपी आप आपल्या घरी निघुन गेले. फिर्यादी हा सायंकाळी ५ वाजता घरून झोपुन उठला व अनुप तिवारी यांचे घरासामोरून जात असताना आरोपीतानी संगन मत करून फिर्यादी ला शिवीगाळ करून तु सबेरे हमारे से डम्पींग यार्ड मे ज्यादा की बात कर रहा था असे बोलुन गणेश प्रजापती यांनी फिर्यादी भरत कोरके ला लोंखडी सळाख सारख्या चापट वस्तुने डोक्यावर मारू न जख्मी केले. तसेत आरोपीतानी फिर्यादी ला हाथबु क्यानी मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मार ण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी फिर्यादीच्या तक्रा रीवरून पो स्टे कन्हान येथे आरोपी विरूध्द कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंवि कायद्यान्वये गुन्हा दाख ल करून आरोपीतांचा शो़ध घेत असुन पुढील तपास सफॉ जोसेफ हे करित आहे.