श्री मार्तंड देवस्थान जेजुरी संचालित कोविंड केअर सेंटर मध्ये कोवीड रुग्नासाठी आज धान्यं देण्यात आले,भाग्यदेव घुले.

60

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
हृदयकोटंबा सांगाते अनुहात घोळ वाजे ज्ञानभंडाराचे पोते रिते नव्हे कल्पाअंती या,संपूर्ण जगात कोरोना चा संसर्ग झाला असून आपल्या देशात आणि आता आपल्या शहरात सुद्धा शिरकाव केला आहे. त्यावर मात करण्यासाठी आपले सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. हि भयंकर साथ पसरु नये म्हणून शासनाने लॉकडाउन केले असून संचार बंदी जाहीर केली.
त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती मदत नव्हे कर्तव्य हा उपक्रम हाती घेवुन “श्री मार्तंड कोविड सेंटर जेजुरी ” ह्या ठिकाणच्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असणाऱ्या 150 बंधू-भगिनींनसाठी दररोजच्या जेवणासाठी उपयुक्त असे धान्य रुपी वस्तु आज “देवस्थान चे प्रमुख विश्वस्त संदिप (आप्पा) जगताप”विश्वस्त प्रसाद शिंदे, तसेच खांदेकरी मानकरी जालिंदर ( नाना ) खोमने,काका कुंदळे, मा.शहराध्यक्ष भा ज पा अशोक खोमणे, घाडगे साहेब, विनोद विरकर ह्यांच्या कडे सुपूर्द केले…भाग्यदेव घुले म्हणाले,आपणा-सर्वांसाठी खंडेराया जवळ एकच मागणं आहे येणारा काळ आपणाकरीता आपल्या स्वजनांकरीता आरोग्यदायी रहावो ….!
तसेच उद्योजक विनेश भोजे यांनी आपण लवकरच सर्वजन या परिस्थितीतून बाहेर येवु ह्यासाठी सर्वांच्या वतीने श्री खंडेराया चरणी प्रार्थना केली.आपण काही समाजाचे देणे लागतो याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत “मदत नव्हे तर कर्तव्य”हा उपक्रम राबवला.
यावेळी उद्योजक ” विनेश भोजे “आणि “भाग्यदेव ए घुले” ” मनिष चौधरी” यांनी म्हटले अशाप्रकारे येणाऱ्या प्रत्येक संकट प्रसंगी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे “श्री मार्तंड कोविड सेंटर जेजुरी” यांना सांगितले.अशा प्रकारच्या गरजेच्या वस्तूंच्या वाटपाद्वारे छोटीशी मदत करण्यासाठी युवा उद्योजक मनिष चौधरी, उद्योजक विनेश भोजे, भाग्यदेव घुले, अमोल ज देवकर, सतिश बांदल, दत्ता घुले, दत्तात्रय (बाळु) घुले, मारुती मोरे, रोहिदास जोशी, नंदु घुले, नामदेव गोळे, अशोक वहिले, प्रल्हाद घुले आदि उपस्थित होते .व नागरिकांना आवाहन देखील करण्यात आले.
घाबरु नका पण काळजी घ्या,
प्रशासनास सहकार्य करा.