Home शैक्षणिक खल्लार हायस्कूल खल्लारचा दहावीचा निकाल 96.22%

खल्लार हायस्कूल खल्लारचा दहावीचा निकाल 96.22%

233

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित असलेल्या खल्लार हायस्कूल खल्लारचा दहावीचा निकाल हा 96.22%लागला असून या एकूण 53 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी प्राविण्य श्रेणीत 16 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 23 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 8 तर तृतीय श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शाळेच्या या यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष तथा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य केशवरावजी गावंडे, शाळा समिती सदस्य श्री मधुसूदनजी धाबे, एस जी मोपारी, शाळा निरीक्षक व्हि डब्ल्यू गावंडे, शाळेचे मुख्याधापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थांचे कौतुक केले आहे
———————————–
मिलिंद विद्यालय, गौरखेडा(चांदई)
——————-
राहुल व्यायाम प्रसारक, मंडळ अमरावती द्वारा संचालित असलेल्या मिलिंद विद्यालय गौरखेडा (चांदई)या शाळेचा निकाल हा 86.45%लागला आहे या शाळेत दहावीच्या परीक्षेला एकूण 37 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात प्राविण्य श्रेणीत 6 ,प्रथम श्रेणीत 18 ,द्वितीय श्रेणीत 11 तर तृतीय श्रेणीत 1 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दलितमित्र, समाजभुषण, श्री मधुकररावजी अभ्यंकर, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी कौतुक केले आहे
—————————————-
महात्मा फुले विद्यालय, मार्कंडा येथील निकाल 100%
—————————————-
मार्कंडा बहूउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, मार्कंडा द्वारा संचालित असलेल्या महात्मा फुले विद्यालय, मार्कंडा या शाळेचा निकाल हा 100 %लागला असून दहावीच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखली असून या शाळेतील 7 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 4 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे संस्थेच्यावतीने व शाळेचे मुख्याधापक, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

Previous articleप्रा आ केंद्राची रुग्ण वाहिका चोरी , सर्पमित्र,महामार्ग,कन्हान पोलीसाच्या तत्परेने रूग्णवाहीका व आरोपी मिळाला
Next articleविश्व वारकरी सेनेचे अकोट तहसिल येथे भजन आंदोलन