आई वडीलांचे छत्र हरपलेल्या मुलीच्या लग्नासाठी संजय पंदिलवार कडून आर्थीक मदत

366

 

उपसंपादक /अशोक खंडारे

समाजसेवेचा वसा जोपासत जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय पंदिलवार यांनी इल्लूर येथील एका आई वडीलाचे छत्र हरपलेल्या मुलीच्या लग्नासाठी आर्थीक मदत केली.
इल्लूर येथील सविता विजय भोयर हिचे आई वडील दोघेही स्वर्गवासी झाले .ती काबाळ कष्ट करून आपला उदरनिर्वाह चालवत होती तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तिला साजेल असा वर मिळाला मात्र लग्न करन्यास तिच्या कडे पैसा आडका काहीच नसल्यामुळे ति विवंचनेत सापडली होती कसे करावे , काय करावे तिला उमजेना.
काही गावातील लोकांनी हीची कर्म कहाणी समाज सेवक संजय पंदिलवार यांना सांगितली तेव्हा त्यांनी ईल्लूर येथे तिच्या घरी जाऊन तिला धिर देत लग्नासाठी आर्थीक मदत केली .
आशा संकटं समयी एक देवच माझ्या मदतीला धावून आला असे तिला वाटले
यावेळी संजय पंदिलवार सोबत उपसरपंच रामचंद्र बामनकर, रामदास कोहपरे , तुशार झोडे, समेश झोडे हे उपस्थित होते.
जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय पंदिलवार ह्याच्या या कार्याबद्दल परिसरात कौतुक केल्या जात आहे.