चंद्रपूर जिल्हातंर्गत,चिमूर तालुक्यातील,मौजा काग येथील रेती घाट लिलाव संसयास्पदच! — २०१९ च्या कागदपत्रांन्वये रेती घाट लिलाव.. — २२०८ ब्राश रेती उपसा करण्यासाठी तब्बल दोन वर्षांची मुदत.. — रेती उपसा करण्यासबंधातल्या नियमांची ऐसी तैसी… — केवळ १ महिन्यात अनेक टॅक्टर द्वारा प्रचंड प्रमाणात रेतीचा उपसा! — ५ हजार ब्राशच्या वर रेतीचा उपसा झाल्याची शक्यता! — अयोग्य कार्यपद्धतीला आळा घालण्यासाठी साखळी उपोषणाला बसने चूक आहे काय?

574

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

रेती घाट लिलाव प्रक्रिया हे चालू कागदपत्रांच्या आधारे केली जाते.मात्र चिमूर तालुक्यातील मौजा काग (सोनेगाव) येथील रेती घाट लिलाव प्रक्रिया ही २०१९ च्या कागदपत्रांना अनुसरून चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या द्वारा पार पाडण्यात आली.२०१९ च्या कागदपत्रांन्वये मौजा काग (सोनेगाव) अंतर्गत भुमापण क्रमांक ८०,८१,८२,८३,मोका स्थळांन्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याद्वारे करण्यात आलेली रेती घाट लिलाव प्रक्रिया म्हणूनच पुर्णतः संसयास्पदच असल्याचे दिसते आहे.
रेती घाट लिलाव प्रक्रिया अंतर्गत रेती उपसा कशा पद्धतीने करावा याची नियमावली शासनाच्या परिपत्रकानुसार तयार केली जाते.शासनाच्या परिपत्रकानुसार रेती घाट लिलाव झाल्यानंतर दररोज किती ब्राश रेतीचे उत्खनन करायचे व कोणत्या वाहणाने रेतीची वाहतूक करायची हे जिल्हा खनिकर्म अधिकारी ठरवतो किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला तत्सम अधिकारी ठरवतो?मात्र,या संबंधातील अनियमिततांचे भिजते घोंगडे रेती उत्खनंन नियमावलींची ऐसी तैसी करीत असल्याचे चित्र चिमूर तालुकातंर्गत सातत्याने अनुभवास येते.

रेती घाट लिलाव धारकास दररोजच्या रेती वाहतूक वाहनांची व दररोजच्या रेती ब्राश उत्खनंनाची इतंभूत माहिती सबंधीत तहसील कार्यालयास व जिल्हा खनिकर्म कार्यालयास नियमित देणे आवश्यक आहे.मौजा काग येथील रेती घाट लिलाव धारक श्री.राजेश शंकर मेश्राम रा.भिसी,ता.चिमूर,जि.चंद्रपूर यांनी दैनंदिन रेती ब्राश उत्खनंनाची व दैनंदिन रेती वाहतूक वाहनांची सत्य माहिती संबंधित विभागांना दिलेली नाही.तहसील कार्यालय चिमूर व जिल्हा खनिकर्म कार्यालय चंद्रपूर अंतर्गत संबंधितांचे वैध व अवैध रेती उपसा प्रकरणावर नियंत्रण राहातं नसल्याचे चिमूर तालुक्यातील मौजा काग रेती घाटाच्या घटनाक्रमातंर्गत स्पष्ट झाले आहे.
काग (सोनेगाव) घाट लिलावान्वये ४ मार्च २०२१ पासून २ हजार २०८ रेती ब्राशचे उत्खनंन करण्याची परवानगी घाट लिलाव धारक श्री.राजेश शंकर मेश्राम यांना चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या द्वारे देण्यात आली आहे व सदर २ हजार २०८ रेती ब्राशची उत्खनन मुदत २०२३ पर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांची आहे.सदर घाट लिलाव प्रक्रियेला अनुसरून राजेश मेश्राम यांनी आतापर्यंत,१) ५ लाख ९१ हजार २५ रुपये,,२) २ लाख ६१ हजार ४७५ रुपये,,३) २५ लाख ५७ हजार ५०० रुपये,,४) इ.एम.टी.शुल्क ४ लाख ९ हजार रुपये,,५) इतर शुल्क ९ हजार रुपये,इतकी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केलेली आहे.
मौजा काग (सोनेगाव) भु.क्र.८०,८१,८२,८३, अंतर्गत रेती घाट लिलावा नुसार २ हेक्टर २५ आर परिसरातील रेतीचा उपसा करणे लिलावधारकास बंधनकारक आहे.मात्र या क्षेत्राच्या आत व क्षेत्राच्या पलिकडे रेतीचा उपसा करण्यासाठी अनेक वाहनांचा व जेसीबीचा उपयोग घाट लिलाव धारक राजेश शंकर मेश्राम यांनी केले असल्याचे प्रत्यक्ष मोक्यावरुन लक्षात येते.रेतीघाट लिलाव धारक यांनी आतापर्यंत ५ हजार ब्राशच्या वर रेतीचे उत्खनंन केवळ २ महिन्याच्या कालावधीत केले असल्याचे निदर्शनास येते आहे.
अयोग्य घाट लिलाव प्रक्रियेला विरोध करण्याचा नैतिक अधिकार परिसरातील नागरिकांना व इतर जाणकार नागरिकांना आहे आणि याचबरोबर बेकायदेशीर रेतीच्या उत्खनंनाचा विरोध करण्याचा कायदेशीर अधिकार सुध्दा नागरिकांना आहे.लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा नागरिकांचा अधिकार नाकारतांना अधिकाऱ्यांनी सतविवेक बुध्दीला व आपल्या जबाबदार कर्तव्याला आठवलेले बरे राहील!
चूका प्रशासनीक स्तरावर अधिकाऱ्यांनी करायच्या व त्या चूका आंदोलन कर्त्यांवर ढकलायच्या,ही कुठली कार्यपद्धत?
रेती घाट लिलाव धारक राजेश शंकर मेश्राम यांची आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत नाही की ते लाखो रुपयांचे व्यवहार एका महिन्यात करु शकतील!,त्यांच्या मागे कुठलातरी बडा धोंडा आहे,हे नाकारता येत नाही.या बड्या धोंड्याच्या बलावरच रेतीचे वैध व अवैध उत्खनन केले जात आहे हे अधोरेखित…