माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे कोरोणा संसर्गजन्य आजार अंतर्गत निधन..

662

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजयबाबू देवतळे यांचे नागपूर येथे उपचारा दरम्यान कोरोणा संसर्गजन्य आजार अंतर्गत काल निधन झाले.
ते शांत स्वभावाचे व मृदू भाषी होते.त्यांचे मुळ गाव वरोरा तालुक्यातील मौजा सोईट आहे.राष्ट्रीय काॅग्रेस पक्षात असताना ते भद्रवती-वरोरा विधानसभा मतदारसंघातून ४ वेळा निवडून आले होते व आमदार म्हणून त्यांनी चार वेळा लोकप्रतिनिधीत्व केले.या क्षेत्रातंर्गत मतदारांनी त्यांच्यावर अपार प्रेम केले व विश्वास दाखविला होता..
काॅग्रेस पक्षाच्या सत्ता काळात सांस्कृतिक व कार्यक्रम मंत्री म्हणून त्यांनी राज्यांचे कामकाज पाहिले.याच बरोबर त्यांनी चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
नंतरच्या काळात त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला व भद्रवती-वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले परंतू थोड्या मतांच्या फरकाने ते पराभूत झाले होते.त्यांच्या अकाली मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.