संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी राकाँचे रविंद्र रणदिवे यांची नियुक्ती

85

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या समितीतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या असून यामध्ये देसाईगंज तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संगायो शाखेतील सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुरुड येथील कार्यकर्ते रविंद्र रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे.
रणदिवे यांची निवड पक्षातील एकनिष्ठता व गोरगरीब जनतेसाठी मनात असलेली कळवळा लक्षात घेता निवड करण्यात आली.देसाईगंज तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना,राष्ट्रीय प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील पात्र व अपात्र
लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता समितीचे अध्यक्ष, सदस्य यांची निवड करण्यात येते.याअगोदर संगायो शाखेतील समिती नेमली गेली नसल्याने जिल्ह्यातील अनेक निराधारांची प्रकरणे प्रलंबित स्वरूपात होते.सध्या स्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालय येथील संगायो शाखेतील समिती नेमली गेली असल्याने निराधारांची प्रलंबित स्वरूपातील प्रकरणे निकाली काढण्यास मदत होणार आहे.रणदिवे निराधारांची जास्तीत जास्त नवीन प्रकरणे मंजुरीसाठी व जी प्रकरणे प्रलंबित स्वरूपातील आहेत अशी प्रकरणांकडे लक्ष घालून तालुक्यातील निराधारांची प्रकणे निकाली काढण्यास भर देणार असल्याचे सांगितले.
रणदिवे यांनी आपल्या निवडीचे श्रेय गडचिरोली जिल्ह्याचे नेते माजी राज्यमंत्री तथा आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम,युवा नेतृत्व तथा प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर,प्रदेश संघटक सचिव युनूस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा सरचिटणीस तथा जेष्ठ नेते श्याम धाईत,देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्ते यांचे आभार मानले.