Home नागपूर प्रा आ केंद्राची रुग्ण वाहिका चोरी , सर्पमित्र,महामार्ग,कन्हान पोलीसाच्या तत्परेने रूग्णवाहीका व...

प्रा आ केंद्राची रुग्ण वाहिका चोरी , सर्पमित्र,महामार्ग,कन्हान पोलीसाच्या तत्परेने रूग्णवाहीका व आरोपी मिळाला

166

*

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

.
कन्हान (ता प्र): – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चा रूग्णवाहीका चालक उपकेंद्र कांद्री येथे साहित्य घेण्यास गेला असता अज्ञात आरोपीने चोरून पळला असता चालकास दिसल्याने पोलीसाना सुचना दिली. कन्हानचे सर्पमित्र, महामार्ग पुलिस व कन्हान पोलीसाच्या सतर्कतेने स पो नि सतिश मेश्राम व रूग्णवाहीका चालकाने वेळीच पाठलाग करून आमडी फाटयाजवळ रूग्णवाहीका का व आरोपीस चोरून नेताना पकडले.
बुधवार (दि.२९) ला सकाळी ११ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानची रूग्णवाहीका क्र एम एच ३१ सी क्यु १४ ०८ चालक गौरव भोयर हा उपकेंद्र कांद्री येथे सॅनिटाईझर, हात मोजे आणायला गेला. रूग्णवाहीका उपकेंद्रा सामोर उभी करून चाबी काढुन साहित्य घ्यायला गेला व काही वेळातच साहित्य घेऊन परत येत असता अज्ञात व्यकती रूग्णवाहीका नेताना दिसला तेव्हा धावताना रस्त्यात पडलो उठुन कन्हान पोलीसाना सुचना दिली. कन्हानचे चार सर्पमित्र युव क वराडा येथे एम एच के एस पेट्रोल पम्प वराडा जवळील महामार्गावर मित्राची वाट पाहत उभे असताना रूग्णवाहीका सर्व्हीस रोड व डोलत येताना दिसल्याने तिला थांबवुन चालकाची विचारपुस करून महामार्ग पोलीस व कन्हान पोलीसाना माहीती देऊन आरोपी चालकास बंद टोल नाका पोलीस चौकी कडे वळवुन घेण्यास युव कांनी सांगितले तर तो सरळ मनसर कडे घेऊन पळल्याने महामार्ग पोलीसाना जावुन सांगितले. तेवढयात कन्हान पोलीस स्टेशनचे सपोनि सतिश मेश्राम फिर्यादी स गौरव भोयर सोबत घेऊन व महामार्ग पोलीस हयानी पाठलाग करून आमडी फाटया जव ळ रूग्णवाहीका व आरोपीस पकडुन कन्हान पोलीस स्टेशनला आणुन फिर्यादी रूग्णवाहीका चालक गौरव भोयर यांच्या तक्रारीवरून रूग्णवाहीका चोरून नेण्या-या आरोपी मनेजर राम मुन्नीलाल राम वय २२ वर्ष रा. ता. सांगवाडीह जि गोपालगंज (बिहार) यास कलम ३७९ भादंवि नुसार अटक करून पुढील कार्यवाही सुरू केली. सदर रूग्णवाहीका व आरोपी पकडण्याकरिता पोलीस अधि क्षक राकेश ओला, वरिष्ठ निरिक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात सपोनि सतिश मेश्राम, पो.ह. जोसेफ, मंगेश सोनटक्के, मुकेश वाघाडे, नापोशि जितु गावंडे आणि कन्हानचे सर्पमित्र अंकित यादव, चेतन वैद्य, हर्षल वैद्य, विवेक डांगे, हेमंत वैद्य, सुमित खैरकर आदी कामगिरी बजावली.

Previous articleमहिला व बाल विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा-ॲड.यशोमती ठाकूर
Next articleखल्लार हायस्कूल खल्लारचा दहावीचा निकाल 96.22%