रेगडी येथे एकाच दिवशी 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

66

 

प्रतिनिधी प्रविण तिवाडे

गडचिरोली: जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे एकाच दिवशी 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी 17 कोरोणा पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे परिसरात प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शासनाने राज्यामध्ये लॉक डाऊन जाहीर केले आहे व काही नियमावली लागू केली आहे मात्र रेगडी हे गाव महाराष्ट्रात आहे की नाही असा प्रश्न पडला आहे कारण रेगडी येथे शासनाच्या लॉक डाउन चा पूर्णपणे विसर पडल्याचे दिसत आहे. लग्न समारंभ खुलेआम सुरू असून लोकांची आवक-जावक, धार्मिक सामाजिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. याचाच फटका रेगडी गावाला बसला असून रेगडी मध्ये एकाच दिवशी १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
रेगडी येथे स्वतंत्र ग्रामपंचायत असून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पोलीस स्टेशन सुद्धा आहे मात्र येथे कुठलेही प्रकारचे निर्बंध असल्याचे दिसत नाहीत. बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेरून आलेल्या कुठल्याही लोकांच्या नोंदी घेतल्या जात नाहीत तसेच लोकांच्या कार्यक्रमातही नियम पाहिले जात नाहीत.मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येत आहेत.
रेगडी येथे मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला असून शासनाने तात्काळ रेगडी येथील सर्व लोकांची कोरोणा टेस्ट करावी तसेच रेगडी हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करावे तसेच रेगडी येथे तात्काळ विलगीकरण कक्ष करावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.