गोर गरीब जनतेला वैद्यकीय खर्चात कपात करुन सहकार्य करावे भारतीय मानवाधिकार संघटनची मागणी

93

 

चिखली:- बुलडाणा जिल्हा.
मनोज बागडे, विशेष प्रतिनिधी.
गोरगरीब जनतेला वैद्यकीय खर्चात कपात करुन सहकार्य करण्यात यावे असे भारतीय मानवाधिकार संघटन बुलडाणा जिल्हयाच्यावतीने तालुका दंडाधिकारी तहसिलदार मेडीकल असोशीएशनचे अध्यक्ष डाॅ सुहास तायडे व केमीस्ट असोशिएशनचे अध्यक्ष स्वप्नील तायडे यांना निवेदनाव्दारे मागणी केली.
खाजगी क्षेत्रातील डॉक्टर्स बांधवांना आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच औषध विक्रेते सर्वांनाच विनंती करण्यात येत आहे की, आजच्या कोरोणा महामारीच्या कठीण प्रसंगात तुमच्याकडून सगळंच चुकतंय अस नाही परंतु आपण फक्त पैसा मिळविण्यासाठी काम करत नसुन कोरोणा संक्रमणात अडकलेल्या प्रत्येक मानवाला म्हणजेच रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांचे प्राण वाचविण्यासाठी अतौनातप्रयत्न करीत आहात. परंतु काहि गौरगरीब रुग्ण व त्यांचे नातेवाईक अक्षरशः रडत आहेत इतके पैसे आणायचे कुठून आणि पैसे उपलब्ध झाले नाही तर डोळ्यासमोर माणसं मरू द्यायची का याआधी कधीच झाली नसेल इतकी भयंकर अवस्था आज आपल्या सर्वांच्या समोर आहे हे चित्र अत्यंत भयावह भयानक आणि हृदयद्रावक आहे तसेच पतीला कोरोणा झाला तर पत्नी गळ्यातील मंगळसूत्र मोडून घरात आहे तेवढी दागिने मोडून उपचारासाठी पैसे उपलब्ध करत आहे तसेच काही लोक व्याजाने पैसे घेऊन डॉक्टर्स व मेडिकलचे बिल भरत आहे यामुळे गोरगरिबांचे अतोनात हाल होत आहेत त्यामुळे शासनाच्या नियमावलीचे पालन करण्यात यावे तसेच पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आज रोजी गरिबातील गरीब करू शकत नाही तर मोठ्या दवाखान्याचे 80 ते 90 हजार सव्वा लाख तीन लाख पाच लाख एवढे बिल कुठून भरणार या आर्थिक विवंचनेत गोरगरिबांचे अतोनात हाल होत आहेत त्यांना मृत्यू जवळ करावा असं वाटत आहे हे फक्त पैशामुळे आणि ही रक्कम जुळवा-जुळव करताना रुग्णाचे नातेवाईक किती कासावीस होतात त्यांची किती फरफट होत असेल याची जाणीव डॉक्टर व औषध विक्रेत्याला नसेल ही कदाचित सध्या लाॅकडाउन मध्ये सर्व उद्योगधंदे व्यवसाय जवळ जवळ बंदच आहेत त्याचा मोठा आर्थिक फटका सर्वसामान्य सह सर्व स्तरातील नागरिकांना होत आहे त्यामुळे कोरोणाच्या या कठीण काळापुरता वैद्यकीय व्यवसाय व औषध विक्री हा व्यवसाय नसून माणसे जगणे हे एकमेव ध्येय आपण बाळगावे तसेच काही डॉक्टर व औषध विक्रेत्यांना राजाश्रय असेल अधिकारी यांचे अभय असेल परंतु याच लोकांच्या आशीर्वादाने आपले व्यवसाय भविष्यात थाटात चालणार आहेत लोकच नसतील तर सर्वच व्यवसाय बंद करतील त्यामुळे लोकांना घाबरून न देता त्यांना आर्थिक संकटात न टाकता त्यांना दिलासा देत डॉक्टरांचे फीज व इतर बिले औषधी चे दर कमी करून गोरगरीब रुग्णांवर उपचार करावे तसेच आपण आपल्या स्तरावर सर्व डॉक्टर व औषध विक्रेत्यांना विनंती करावी असे निवेदन तहसिलदार मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ सुहास तायडे व केमीस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रशांत भैय्या डोंगरदिवे जिल्हा उपाध्यक्ष हि रा गवई सर तालुकाध्यक्ष दिनेश आडवे तालुका उपाध्यक्ष द्वारकाजी नकवाल तालुका सचिव कल्पनाताई केजकर तालुका महासचिव शेख राजू भाई सामाजिक कार्यकर्ते श्यामभाऊ वाकदकर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सुरडकर हे उपस्थित होते.