मछिंद्र पार्डीला आणखी एका बिबट्याचा मृत्यु.

82

 

माहूर प्रतिनिधी // पवन कोंडे

 

माहूर तालुक्यातील मछिंद्र पार्डी शिवारात गुरुवारला एक बिबट्या (मादी) मृत अवस्थेत अढळला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारला काही पावलावरच ज्वारीच्या पीकात आणखी एक बिबट्या (नर ) मरण पावल्याचे निदर्शनास आल्याने सर्वत्र हलकल्लोळ मचला आहे.
गाईच्या बछड्याला मारल्याने चिडलेल्या मालकाने अर्धवट शरीराला जवळच एका खड्यात फेकून त्यावर किटकनाशक टाकले होते. तेच विषयुक्त मांस सेवन केल्याने गोंडस व देखण्या बिबट्याच्या नर- मादीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचे पाहून उपस्थित मंडळीतून हळहळ व्यक्त केल्या जात होती.
बछड्याच्या अर्धवट शरीरावर किटकनाशक टाकल्याची बाब बिबट्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याने प्रकाश जगनलाल जयस्वाल याचेवर जबाबदारी निश्चित करून वन विभागाने सन 1972 च्या वन्यजिव संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करून माहूर न्यायालया समोर उभे केले असता,न्यायालयाने त्याला तिन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.
* बिबट्याचे जोडपे जंगलातील नव्हे तर नदी परिसरातील असेल अशी शक्यता वन परीक्षेत्र अधिकारी भगवान आडे यांनी व्यक्त केली.*
एकंदरीत होणारी भरमसाठ वृक्षतोड,वन्य प्राण्यांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती, आणि सलग तिन तिन दिवस धूमसणारा वनवा ह्या बाबी वनविभागाच्या कर्मदरिद्रतेचेच लक्षण होय.