प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केंद्र सुरु करा – अविनाश पाल

93

 

सावली (सुधाकर दुधे )
– जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा अभाव आहे. अशाही परिस्थितीत येथील वैद्यकीय अधिकारी कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दिवसे-दिवस कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या कमालीची वाढ होत असल्याने सेवारत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारयाची चांगलीच धांदल उडत आहे. सध्या तालुक्यात ४५ वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरु आहे पण सध्या लसीची तुटवडा सुरु आहे. तसेच रेमिडीसीवीर इंजक्शन व आक्सिजनची सुद्धा तुटवडा असल्याने आरोग्य सेवेचे त्रिधा तीरपीट उडाली आहे. यातच जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेली व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड केअर युनिट सेंटर तयार करावे. अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबिसी मोर्चा श्री अविनाश पाल यांनी मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, जिल्हा अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा मुख्यालय असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरु करून स्थानिक परिसरातील रुग्णाची व्यवस्थित आरोग्य सुविधा देता येईल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कोविड रुग्णाची व्यवस्थित देखभाल सेवा करू शकतील. जर एखादा रुग्ण खूपच गंभीर स्वरूपाचा असेल त्या रुग्णास तालुका स्तरावर किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करता येईल तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यावरील कामाचा ताण कमी होऊन आरोग्य सेवा देणे त्यांना शक्य होईल. हि बाब लक्षात घेऊन श्री अविनाश पाल यांनी मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, खासदार अशोकभाऊ नेते, जिल्हा अधिकारी यांना जिल्ह्यातील नागरिकाना आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.
नागरिकांनी प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये जाऊन लसीकरण करून घ्यावे. प्रत्येकांनी मास्क लावावे, सानिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवून स्वताला आणि आपल्या जवळील नागरिकांना सुरक्षित ठेवावे असे सुद्धा आव्हान श्री. अविनाश पाल यांनी केला.