आरोग्य विभागाने तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना चाचणी करणे गरजेचे – आशिष अग्रवाल

93

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची –
मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये मध्ये सर्वत्र झपाट्याने वाढ होत असून अशीच वाढ कोरची तालुक्यात सुद्धा बघितली जात आहे. तालुक्यातील बहुतेक नागरिकांना सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असल्यामुळे प्रत्येक गावात आरोग्य विभागाने कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. कारण कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाल्यास ही साखळी तोडण्यास प्रशासनाला नक्कीच मदत मिळेल. तपासणी झाल्याशिवाय कोरोना वर मात करणे कठीण होईल तसेच बहुतेक रुग्ण हे प्रकृती खालावल्यानंतर रोगनिदानासाठी रुग्णालयात दाखल होत असल्यामुळे तालुक्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत. कोरची तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा व कोटगुल येथे असून बेतकाठी, मसेली व बेडगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तालुक्यात दहा आरोग्य वर्धिनी केंद्र तसेच 5 मानसेवी अधिकारी असल्यामुळे लवकरच तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकाची तपासणी होऊ सकते यात शंका नाही.
दोन दिवसांपूर्वी कोरची शहरात विनाकामाने फिरणाऱ्या किंवा काही कामानिमित्त शहरात प्रवेश केलेल्या 270 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 39 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. जर बाहेर फिरणाऱ्या जवळपास 15% व्यक्तींना संसर्ग झालेला आहे तर मग घरीच सर्दी, खोकला व तापाने आजारी असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाला हरविण्यासाठी युद्धपातळीवर गावोगावी कोरोनाची चाचणी व लसीकरण करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरची चे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी केले आहे.