आप’ ने रत्नागिरी नगर पालिकेला चक्रीवादळ व मान्सूनपूर्व घ्यावयाची दक्षता संदर्भात सुचवल्या काही उपाययोजना….

107

 

प्रतिनिधी गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : आगामी पावसाळी हंगामापूर्वी मागील दोन हंगामात आणि त्या समवेत असलेले ४ प्रचंड चक्रीवादळांचे निरीक्षण करता चक्रीवादळांचा हंगाम पावसाळ्यात नित्याने येत असल्याचे लक्षात येते. गेल्या चक्रीवादळात कोकणाचे झालेले नुकसान हे सर्वांना माहीतच आहे. मुख्यत्वे करून दापोली मधील इलेक्ट्रिक ग्रिड संदर्भात झालेले नुकसान व परिस्थितीचे निरीक्षण करता नगरपालिकेच्या पूर्व तयारीनेच पुढील हंगामात टोकाच्या हवामानात होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येणे शक्य आहे.
मागच्या पावसाळ्यात निदर्शनास आलेल्या गोष्टी मी खाली अधोरेखित करू इच्छितो
1. मागच्या वर्षी काही सांडपाण्याच्या पाईप लाईन तुंबल्यामुळे रस्त्यावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला तसेच अनेक भागांमधल्या नागरिकांना आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागला. नाळ पाणी योजना योग्य पद्धतीने राबविल्या न गेल्याने गडूळ पाण्याचा नळाद्वारे पुरवठा झाला.
2. वादळी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने अनेक भागात पावसाचे पाणी रस्त्यावरून वहात होते. रस्त्या वरचे खड्डे पाण्याने भरल्याने व खड्डयांच्या खोलीचा अंदाज न आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान होऊन अपघात घडले.
3. चक्रीवादळाच्या काळात वीज तारा या सगळ्यात संवेदनशील असून त्या झाडांच्या जवळून जातात, झाडाची एखादी मोडून पडलेली फांदी अथवा उन्मळून पडलेल्या झाडामुळे वीज बंद होऊन परिसरातल्या रुग्णालयांना बॅकअप वर अवलंबून राहावे लागते.
4. रत्नागिरी जिल्ह्यात होर्डिंग ची संख्या वाढली असून ही चिंतेची बाब आहे, चक्रीवादळा दरम्यान पावसासोबत जोराचा वारा असल्याने हे मोठे बोर्ड मूळापासून उखडून खाली कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
5. रस्त्यांची परिस्थिती अतिशय भयानक असून त्यांची दुरूस्ती तातडीने पावसाळ्यापूर्वी होणे आत्यावश्यक आहे.
6. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे डासांमुळे उद्भवणार्‍या रोगाचा प्रादुर्भाव रत्नागिरीत मुख्यत्वेकरून २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते.
वरील नमूद केलेल्या गोष्टींचा सखोल विचार करून, खलील उल्लेखित निर्देशांची तातडीने कार्यवाही होणेबाबत विनंती आहे.
1. शहरातील ड्रेनेज सिस्टममधील संभाव्य चोक पॉईंट्सची पाहणी करून त्यानंतरच्या त्या समस्याग्रस्त नाल्यांचे डि-स्टिल्टिंग करणे
2. चुकीच्या बांधल्या गेलेल्या नाल्यांची तपासणी करणे व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी इनलेट्स बसवणे.
3. महावितरण विभागाशी समन्वय साधून मुख्यत्वे करून रुग्णालयाच्या जवळच्या वीजेच्या तारांजवळील वृक्षांच्या फांद्या वार्षिक तत्वावर तोडणे. माझ्या निदर्शनास आले आहे की नगरपालिकेकडे रस्त्यावरचे दिवे बदलण्यासाठी शीडी उपलब्ध नसून वरती चढण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जातो, ही बाब खरी असेल तर त्यादृष्टीने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे.
4. बोर्ड्स आणि होर्डिंग्स ना त्याच्या मजबुतीला अनुसरून लाल व हिरव्या रंगाचे टॅग लावावेत जेणेकरून वादळाच्या काळात लाल रंगाचे टॅग असलेले होर्डिंग्स काढून संभाव्य दुर्घटना टाळता येईल.
5. रस्त्यांची पावसाळयापूर्वी तातडीने दुरूस्ती करावी अन्यथा नागरिकांच्या जीवाला व सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो तसेच माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या रस्ता व्यवस्थापने संदर्भातील २०१५ च्या पीआयएल नं. ७ च्या सूचनांचे उल्लंघन होईल.
6. सांडपाण्याच्या गटारी योग्य पद्धतीने झाकून डासांचे प्रजनन होणार्‍या जागांचा शोध घेऊन तेथे योग्य ती उपाय योजना करावी.
7. डासांमुळे होणार्‍या रोगांच्या बाबतीत जागृतीकरणाची मोहीम राबवावी.
मला आशा आहे की, पूर्वी घडलेल्या नुकसानाची व दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वरील सूचनांचा आणि सल्ल्यांचा खोलवर विचार केला जावा अशी विनंती आम आदमी पार्टीच्या वतीने ज्योती पाटील यांनी केली आहे.

*दखल न्यूज भारत.*