लोटे एमआयडीसी अपघात प्रकरणी रिपाइं आक्रमक; केंद्राच्या हरित लवादा समोर प्रश्न मांडणार

118

 

प्रतिनिधी प्रफुल्ल रेळेकर

खेड : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मध्ये अपघाताची मालिका सुरूच असून कम्पन्या च्या व्यस्थापनच्या अनागोदी कारभारा मुळे नाहक कामगारांचा बळी जात आहे एकीकडे आग स्फोट व मृत्यू वाढत चालले असताना जुन्या कंपन्या मात्र नियम डावलून उत्पादन घेत पर्यावरणाचा र्हास करत असल्याने हा प्रश्न पक्ष अध्यक्ष रामदास आठवले यांच्या माध्यमातून
हरित लवादा समोर मांडणार असून एमआयडीसी प्रकरणी वेळ पडल्यास उपोषण छेड न्याचा इशारा रिपाइं चे कोकण संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे
लोटे एमआयडीसी भोपाळ च्या उंबरठ्यावर आहे येथील जनता देखील भीतीच्या छायेखाली वावरत आहे त्यांना देखील एमआयडीसी पासून धोका आहे किंबहुना अनेकांना कॅन्सर सारख्या व्याधीने ग्रासले आहे असे असताना अनेक जुन्या कम्पन्या ना उत्पादन बंद करण्याचे आदेश देऊन देखील त्या सुरू असून पर्यावरना चा समतोल ढासळवत आहेत अशा कम्पन्या ची आपण माहिती घेऊन त्या बंद करण्या साठी वरीष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे
तसेच लोटे मधील हवेची गुणवत्ता देखील तपासन्याची गरज आहे सीईटी पी सारखा प्रकल्प असताना नद्या खाडी पात्र दूषित होत आहेत त्या कडे ही केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साठी ना आठवले यांच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

अनेक कम्पन्या कामगार वर्गाला किमान वेतन तसेच अन्य सेवा सुविधा देत नाही याबाबत आवाज उठवणार आहोत वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले तरी ते करणार असल्याचा गर्भित इशारा सकपाळ यांनी दिला आहे एमआयडीसी मध्ये राबविण्यात येणाऱ्या उपाय योजना बाबत ज्या कम्पन्या चाल ढकल करत आहेत अशा कंपन्या ना ची माहिती मागवून त्यांच्या विरोधात वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्या साठी रिपाइं आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सकपाळ यांनी स्पष्ट केले आहे.

दखल न्यूज भारत