रस्त्यावर अवतरला खाकी वर्दीतील देवदूत.

150

 

खेड प्रतीनीधी – प्रसाद गांधी .

देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षभरापासून चालू आहे, त्यामध्ये सर्वसामान्यांपासून अगदी करोडपती व्यक्तीपर्यंत सर्वजण कोरोनाशी दोन हात करून लढत आहेत. कोण आपल्या आर्थिक परिस्थितीशी लढतो, कोण कार्यालयात काम करत लढतो, कोण रुग्णालयात रुग्णांना वाचवण्यासाठी लढतो, तर कोण थंडी, ऊन, पाऊस यावर मात करत महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून देवदूताप्रमाणे काम करत लढतो, तो म्हणजे “महाराष्ट्र पोलिस “.
महाराष्ट्रामध्ये कडक लाॅकडाउनची पुन्हा एकदा घोषणा करण्यात आली, आणि परत एकदा महाराष्ट्र पोलिस कामाला लागले. कधी समजावून सांगत, कधी गाण्यांच्या स्वरूपात, तर कधी दंडुक्याचा धाक दाखवत. लोकांनी घरात बसावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर काही मोकाट फिरणाऱ्यांसाठी स्वाॅब टेस्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे, याच भीतीने अनेकांनी मोकाट फिरणेही टाळले आहे. यामुळे रस्त्यावरील या कोवीड योध्यांना म्हणजे महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा! जय हिंद!

*दखल न्यूज भारत*