पक्षांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’ ● स्माईल फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

221

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

वणी : शहरीकरणामुळे शहरात पक्षांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे . त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे . यावर उपाय म्हणून पक्षांच्या संवर्धनासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे अभिनव उपक्रम राबवला जात आहे . या उपक्रमात परिसरातील अनेक झाडांवर कृत्रिम घरटी तयार करण्यात आली आहे . याशिवाय पक्षांसाठी खाद्य व पिण्याची पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे शहरातील वॉटर सप्लाय च्या आतमध्ये स्माईल फाउंडेशन तर्फे पक्षांसाठी ‘ पक्षीतीर्थ ‘ उभारले आहेत . या ठिकाणी पक्षांसाठी सध्या 8-10 कृत्रिम घरटे बांधण्यात आले आहे . याठिकाणी पक्षांसाठी दाण्यापाण्याची व्यवस्था देखील केली गेली आहे . येत्या काही दिवसात इतर ठिकाणीही पक्षांसाठी अशाच कृत्रिम घरट्यांची सोय केली जाणार आहे.

या उपक्रमासाठी स्माईल फाउंडेशनचे संस्थापक सागर जाधव , पीयूष आत्राम , खुशाल मांढरे , अभिजीत देवतळे , गौरव कोरडे , सचिन जाधव , आदर्श दाढे यांच्यासह स्माइल फाउंडेशनचे सदस्य परिश्रम घेत आहे