वीज वितरण कंपनीच्या विरोधात 4 ऑगस्टला कोरची – कुरखेडा मार्गावर सर्व पक्षीय बेमुदत चक्का जाम आंदोलन

0
222

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची ःदि 30 जुलै- तालुक्यात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वारंवार निवेदने देऊनही वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात. त्या मुळे अनियमित वीज पुरवठाची समस्या सुटत नाही त्या मुळे महावितरण कंपनी विरोधात 4 ऑगस्ट कोरची – कुरखेडा मार्गावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन दिले आहे .
आज कोरची येथे हनुमान मंदिर मध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक श्यामलाल मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध समस्या वरती चर्चा करून आंदोलन समितीने नियुक्ती करण्यात आली. या आंदोलन समितीने येत्या 4 ऑगस्टला कोरची कुरखेडा रस्त्यावरील झंकार गोंदी फाट्यावरती बेमुदत चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेतला आले. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली आहेत. त्यामुळे आता रोपणी योग्य पिके नसल्याने कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन हेक्टरी 50000 रुपये आर्थिक मदत करावी व कमी कालावधीचे पिकाची कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करून बी बियाणे व खताचा पुरवठा करावा,कोरची तालुक्यात बीएसएनएलचे नेट वर्क चा पुरवठा सुरळीत करावा,
कुरखेडा कोरची येणारी विद्युत पुरवठा खूप मोठ्या जंगलातून येत असल्याने ब्रेक डाऊन अटेंड करण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्यामुळे ही विद्युत जोडणी कुरखेडा कोरची रस्त्याच्या कडेला शिफ्ट करण्यात यावी,
कुरखेडा कोरची विद्युत जोडणी रस्त्याच्या कडेला शिफ्ट करेपर्यंत देवरी वरून विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवण्यात यावा,कोरची हे तालुका मुख्यालय असल्याने सर्वच विभागाचे कार्यालय इथे आहेत त्यामुळे कोरची व तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय फिडर वेगळा करण्यात यावा,कोरची येथील सब सेंटर ला 3.15 चा ट्रांसफार्मर लावलेला आहे. तोही रिपेरींग केलेला आहे . इथे तर पाच पाच पॉईंट चे दोन दोन ट्रान्सफर लावने गरजेचे आहे 3.15 चा ट्रांसफार्मर असल्यामुळे होल्टेज खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. पाच चे ट्रांसफार्मर ताबडतोब लावण्यात यावे .
बेतकाठी गावात पंपाने शेती खूप जास्त प्रमाणात केली जाते. बेतकाठी गावात दोन ट्रांसफार्मर आहेत त्यात एक शंभरचा व दुसरा 25 चा आहे 100 च्या ट्रांसफार्मरवर 75% गाव चालतो व 25 ट्रांसफार्मर 25 टक्के गाव व एजी पंप चालतात 25 चा ट्रांसफार्मर हा वर्षातून दोन-तीनदा जळून जातो त्यामुळे एजी पंपासाठी सेपरेट ट्रांसफार्मर लावणे गरजेचे आहे आणि ही सर्व कामे कोरची येथील कनिष्ठ अभियंत्याच्या अधिनस्त नाहीत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाचवी प्रश्न सोडवले तर कोरची तालुक्यातील विद्युत समस्या सुटू शकतो.
वरील मागण्या दिनांक 3 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण न झाल्यास दिनांक 4 ऑगस्ट 2020 ला सकाळी दहा वाजेपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. तालुक्यातील शेतकरी वीज ग्राहकांनी जास्ती जास्त उपस्थित रहावे असे आवाहन आंदोलन समितीचे अध्यक्ष शामलाल मडावी, , सचिव नंदकिशोर वैरागडे, उपाध्यक्ष नसरुदीभाऊ भामानी, सहसचिव आनंद चौबे, कोषयाधयक्ष मनोज अग्रवाल, पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम, उपसभापती सौ शुसिला जमकातन,प स सदस्य कचरीबाई काटेंगे, कोरची नगरपंचायत अध्यक्ष ज्योती नैताम, उपाध्यक्ष कमलनारायन खंडेलवाल, प स सदस्य सदाराम नुरुटी ,सरपंच संघटना अध्यक्ष हेमंत मानकर, सियाराम हलामी माजी सरपंच, डॉ शैलेन्द्र बिसेन, धनिराम हिळामी, परमेश लोहंबरे ,भुप्रेनद्र भंडारी, गीरजा कोरेटी ,झाडूराम सलामे अध्यक्ष माहाग्रामसभा, अशोक गावतुरे, राजेश नैताम, रामकुमार नायक ,देवराव गजभिये ,सदरुददीन भामानी, आदीनी केले आहे.