दिलासादायक! राज्यात गेल्या 24 तासात 74 हजार 45 रुग्णांची कोरोनावर मात

104

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

महाराष्ट्र:- गेल्या काही दिवसात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्राला ग्रासून टाकले आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसीचा अपुरा पुरवठा, वाढता मृत्युदर, या सगळ्यांमध्ये दिवसेंदिवस राज्याची चिंता वाढत जात आहे. सध्याही परिस्थिती काही वेगळी नाही. मात्र, गेल्या 24 तासांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
राज्यात आज 74 हजार 45 रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर 66 हजार 836 नवीन करोनाबाधित आढळून आले असून, 773 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 34,04,792 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.81 टक्के एवढे झाले आहे.

तर, आजपर्यंत राज्यात करोनामुळे 63 हजार 262 रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52% एवढा आहे.

हे दिलासादायक वृत्त असले तरीदेखील कोरोनामुक्त होण्यासाठी असलेला प्रवास हा राज्यासाठी खूप दूरचा आहे. नागरिकांनी संयमाने आणि स्वयंशिस्तीने राहणे, या एकाच मार्गातून काहीतरी सकारात्मक घडू शकते.

नागरिकांनी घाबरून किंवा गोंधळून न जाता आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे, लॉकडाऊन नसताना सुद्धा बाहेर गर्दी न करता सामाजिक अंतर राखून वावरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क बंधनकारक करणे, हे स्वतःसाठी नागरिकांनी स्वतःहून करायला हवे.

ही नियमावली आता नवी आणि आवश्यक जीवनशैली म्हणून स्वीकारायला हवी तरच असे दिलासादायक वृत्त रोज महाराष्ट्रात येत राहील!