चिमूर तालुक्यातील बोरगाव (बुट्टी) येथील सरपंच रामदास चौधरी यांचे,चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र.. — विलिनीकरणातंर्गत कोरोणा संसर्गजन्य रुग्णांची देखभाल करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीला अनुसरून खर्च करण्याची मागीतली परवानगी.. — बोरगाव (बुटी) येथे कोरोणा पाॅजेटिव्ह रुग्ण..

417

 

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक

कोरोणा संसर्गजन्य आजार हा सर्व प्रकारच्या बाजूंनी अतिशय बिकट समस्या धारण करणारा ठरला आहे व आर्थिक समस्या अंतर्गत चहुबाजूंनी रुग्णांची कोंडी निर्माण करणारा ठरला आहे.भितीदायक वातावरणात कोरोणा रुग्णांची सेवा करणे सहजशक्य नाही किंवा या आजारातंर्गत खुल्लम-खुल्ला मदत करायला मागच्या वर्षी सारखे आता कुणी पुढे येण्याचे धाडस करताना दिसत नाही.तरीही पण एक नैतिक जबाबदारी म्हणून उदारमतवादी व्यवस्थातंर्गत कोरोणा संसर्गजन्य रुग्णांची सेवा करणे आवश्यक आहे व त्यांना धिर देत या आजारातून बरे करणे गरजेचे आहे.यामुळे सर्व प्रकारची परिस्थिती बघता चिमूर तालुक्यातील मौजा बोरगाव (बुटी) येथील सरपंच रामदास चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून १५ व्या वित्त आयोगातंर्गत विलगीकरणातील कोरोणा रुग्णांच्या देखभालीसाठी निधी खर्च करण्यास परवानगी मागितली आहे व याच प्रकारची परवानगी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना द्यावी,असी विनंम्रपणे मागणी केली आहे.

कोरोणा संसर्गजन्य रुग्णांची संख्या ग्रामीण भागातील गावखेड्यात सुध्दा आता दिसू लागली आहे.ग्रामीण भागात राहणाऱ्या असाह्य नागरिकांच्या आरोग्य हितासाठी १५ व्या वित्त आयोगातंर्गत निधी खर्च करण्याची वेळ आली आहे.तद्वतच १५ व्या वित्त आयोगातंर्गत आरोग्य,शिक्षण,उपजिवीका,यासाठी काही निधी खर्च करावयाचा असतो.कोरोणा संसर्गजन्य आजारातंर्गत देशात आपात्कालीन परिस्थिती असल्यामुळे या आजाराला सर्वोतोपरी हरसंभव रोखने आवश्यक आहे.

हाच मुळ उद्देश पुढे ठेवून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ व्या वित्त आयोगातंर्गत गावपातळीवरील विलगीकरणातील कोरोणा संसर्गजन्य रुग्णांची देखभाल करण्यासाठी व तात्पुरत्या प्राथमिक स्तरावरील आरोग्य उपचार करण्यासाठी बिना विलंब निधी खर्च करण्यास काही नियमानुसार मंजुरी द्यावी,असी नंम्रपणे विनंती चिमूर तालुक्यातील मौजा बोरगाव बुटी येथील सरपंच रामदास चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
गृह विलगिकरणातील कोरोणा संसर्गजन्य रुग्ण हे बिनधास्त बाहेर फिरत असल्याचे चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी गाव पातळीवरील शाळा,अंगणवाडी,ग्रामपंचायत,येथे ग्रामीण भागातील सर्व रुग्णांचे विलगिकरण करावे व या रुग्णांची देखभाल सरपंच,ग्रामपंचायत पदाधिकारी,गावातील कोरोणा देखभाल समीतीच्या सदस्यांनी करावे अशा आशयाचे पत्रक २२ एप्रिला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,संवर्ग विकास अधिकारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायतींना पाठवले आहे.

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या याच पत्राचा धागा पकडत त्यांनी १५ व्या वित्त आयोगातंर्गत विलगीकरणातील कोरोणा संसर्गजन्य रुग्णांची देखभाल करण्यासाठी निधी खर्च करण्यास परवानगी मागितली आहे.सरपंच रामदास चौधरी यांनी १५ व्या वित्त आयोगातंर्गत निधी खर्च करण्यास केलेल्या मागणीला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कशाप्रकारे महत्व देतात,यावर मागणीचे गांभीर्य अवलंबून आहे.