मा.प्रा.वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य यांना ऑनलाईन पत्र पाठवून मागणी केली. बारावीच्या शालांत परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे बाबत एडवोकेट अमोल मातेले

55

 

प्रतिनिधी :बाळू राऊत

मुंबई:शुक्रवार दिनांक २३ एप्रिल.ऑफलाइन परीक्षा का नको? कोरोना संक्रमण वाढल्याने बारावीच्या ऑफलाइन परीक्षा काळात विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा निर्माण होण्याचा धोका अधिक संभवतो.या काळात परीक्षा केंद्रावर कोरोनाला प्रतिबंध घालणाऱ्या कितीही उपाययोजना केल्या तरी एका बधितामुळे अनेकांना त्याचा ताप होऊ शकतो. शिवाय परीक्षा केंद्रावर जाता येता प्रवासा दरम्यानच्या विद्यार्थ्याना कोरोना बाधा होण्याचा धोका आहे.ऑफलाइन परीक्षेसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात पुरेसा अभ्यास आणि तयारी झाली नसल्याने विद्यार्थ्यांच्या मनात परिक्षे बाबतीत कमालीचा गोंधळ आहे.ऑफलाइन शाळा आणि गेले वर्षभर घेण्यात आलेले ऑनलाइन आभासी शिक्षण यात फरक आहे.शालांत परीक्षा ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन ऑफलाइन परीक्षा नकोच, या निर्णयाचा फेरविचार करावा. आसे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी शालेयशिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली ऑनलाइन पत्र पाठवून मागणी केली. राज्य सरकार यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या बाजूने कौल देईल, अशी आम्हाला आशा आहे!
अॅड.अमोल मातेले,
मुंबई अध्यक्ष
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,
महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते,
राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस