रांगी येथील स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाची चनादाळ ग्राहकांच्या माथी

63

 

धानोरा तालुका प्रतिनिधी 23/4/2021 धानोरा तालुक्यातिल रांगी येथिल स्वस्त धान्य दुकान क्रमांक 2मधून चालू महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये चणाडाळ अंतोदय कार्ड धारकांना वितरित करण्यात आली आहे. मात्र शासनातर्फे पाठविण्यात आलेल्या चणाडाळ निकृष्ट दर्जाची असल्याची ओरड लाभार्थी करित आहेत. स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात आलेल्या चणाडाळ निकृष्ट दर्जा ची असुन गुरांना चारण्यासाठी सुद्धा योग्य नाही . सदर चनाडाळी मध्ये पूर्णपणे लागलेली असून त्यात उंदराच्या लेंड्या आणि लोर ,जाळ्या लागलेल्या असल्याने रेशन कार्डधारकांना गुरेढोरे समजून शासनाने ही चणाडाळ ग्राहकांच्या माती 45रुपयात जबरदस्ती ने लादलेली आहे. त्यामुळे लाभार्थी दुखावले असुन ही निकृष्ट दर्जा ची दाळ वितरीत करुण शासनाने गरीबाचि थट्टा चालविली की काय? धानोरा तालुक्यातिल सालेभट्टी व चिचोडा या गावातिल लाभार्थाना आशिच दाळ वितरीत करन्यात आलि. त्यामुळे संबंधित व्यक्ती वर कार्वाही करन्याची मागणी लोकांनी केलि आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी येथील स्वस्त धान्य दुकानातून चालू एप्रिल महिन्यामध्ये लाभार्थी नां‌ 1किलो. चनादाळ घेन्याचि मानसिक अवस्था नंसतानाही प्रति किलो 45रुपये घेऊन वितरीत करण्यात आली.लाभार्थि घेन्यास तयार नसतांना साखर,गहू तांदुळ माल देनार नाही त्यामुळे घ्यावेच लागते असे म्हणुन रांगी येथील 60ते 70लाभार्त्यानां पैसे मोजून घ्यावे लागले मात्र पैशाने खरेदी केलेल्या दाळीचे काय करावे असा मोठा प्रश्न लाभार्थाना पडलेला आहे.कारण येवढी खराब दाळ कोणिच खाऊ शकत नाही. दाळ पाहताच शनि तिची अवस्था किती वाईट आहे हे लक्षात येते. गरीबांनी पैसे मोजून घेतलेली दाळ खाउशकत नाही तर नायचेच कशाला? अंत्योदय वाल्यानकडे पैसे जास्तीचे आहेत का?निररोपयोगी दाळ देवुन शासनाने आमच्या वर मोठा अन्याय केला .हिच दाळ खाऊन एखाद्या व्यक्ति दगावला कीवा मरण पावला तर जबाबदार कोण असा प्रश्न हेच लाभार्थी विचारीत आहेत.खराब माल पुरवठा करनार्या अधिकाऱ्यांवर कारवाई करन्याची मागणी रांगि येथिल माणिक चापडे,श्रावण रोहनकार,अनंता चापडे,युधिष्ठिर ईन्कने,वसंत चापडे ,ईसन चापडे या लाभार्थी नि केली.

रांगी स्वस्त धान्य दुकान क्रमांक 2 चे मालक सलामे यांना विचारणा मोबाईल वरुन विचारले असता म्हणाले आम्ही चालान भरुन पास करून पैसे भरतो .मात्र माल तहसिलकार्यालया मार्फत घरी पोहचता केल्या जाते.तेव्हाच आम्हाला कळते.मगच लाभार्थी ना वितरीत करतो.माञ न नेले ल्या लाभार्थी दाळ अजुनही शिल्लक आहे.

पुरवठा निरीक्षक प्रधान यांना भ्रमंनध्वनीवरुण विचारणा केली असता खराब असलेला माल गोडावून ला परत करु शकतात असे सांगितले.

गोडावून किपर आंकनुरवार यांच्याशी संपर्क केला अस्ता लाभार्थानां दाळ वितरीत करन्या पुर्वि साफ करन्यास दुकानदारास सांगितले.