ब्रह्मपुरी येथील पत्रकार गुरुदेव अलोने यांचे करोणा मुळे निधन

0
127

ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी येथील दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी गुरुदेव अलोणे वय (४०) वर्ष यांचे 23 एप्रिल ला १२ वाजता कोरूना मुळे निधन झाले
गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रह्मपुरी येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले होते त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत प्रशासकीय यंत्रणा सुद्धा कामाला लागली होती मात्र अचानक श्वासोच्छवासास अधिकच जास्त त्रास वाढत गेल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने व त्यांना ओ पाझीटीव्ह प्लाझ्माची नितांत गरज भासत होती ते वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे गुरुदेव अलोणे यांचे दुःखद निधन झाले गुरुदेव अलोणे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व उच्चशिक्षित होते शिवाय पंजाबराव देशमुख कन्या विद्यालयात त्यांनी कंत्राटी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणी केली होती महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ शाखा ब्रह्मपुरी चे संघटक म्हणून ते कार्य करत होते त्यांच्या या दुःखद निधनाने ब्रह्मपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे