वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावान कार्यकर्ते मनोज गायकवाड यांचा,कोरोणा संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू!

102

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर:-

चिमूर तालुकातंर्गत मौजा वाकर्ला येथील रहिवासी व वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोज पुंडलिक गायकवाड यांची आज कोरोना आजाराने प्राणज्योत मालवली.
त्यांच्या मागे पत्नी,मुलगी,आई असा आप्त परिवार आहे.त्यांच्या अकाली निधनाने गायकवाड कुटुंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सामाजिक कार्यामुळे त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचे,समाजाचे तसेच
वंचित बहुजन आघाडीचे फार मोठं नुकसान झाले.
मौजा वाकर्ला येथील अविनाश गायकवाड तसेच वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूरच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.