कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर फोन पे आणि खिशातून पैसे काढले नातेवाईकांच्या तक्रारीनंतर जालना पोलिसात गुन्हाा दाखल आरोपी पोलिसांच्या ताब्यात

226

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर फोन पे आणि खिशातून पैसे काढल्याची धक्कादायक घटना खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात घडलीये… चार दिवसांपूर्वी जालना येथील सरकारी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये कचरू पिंपराळे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.. त्यानंतर मृताच्या तिसर्या दिवशी विधी पार पडल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा मोबाईल पाहिल्यावर त्यातील फोन पे च्या माध्यमातून 6 हजार 800 रुपये दुसर्याच्या खात्यात वळते केल्याचं लक्षात आलं.. त्याचबरोबर खिशातील 36 हजार रुपयेही गायब होते.. त्यानंतर नातेवाईकांनी दु:खातून सावरत पोलिसात धाव घेतली.. दरम्यान नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं… मोमीन मोहसीन मोमीन नजीर असं या आरोपीचं नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत